स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव! ठाण्यात मॅरेथॉन स्पर्धा; पहिले पारिषोतिक १५ हजार

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने 14 ऑगस्ट रोजी 10 किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरची मॅरेथॉन स्पर्धा ही ठाणे महापालिका भवन येथून सुरू होऊन त्याच ठिकाणी समाप्त होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेत नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

( हेही वाचा : “मी नाराज नाही…मुख्यमंत्र्यांवर माझा पूर्ण विश्वास” मंत्रिमंडळ विस्तारावर संजय शिरसाटांचे स्पष्टीकरण )

मॅरेथॉन मार्ग

जिल्हास्तरावर होणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेसाठी पुरूष (वयोगट 18 वरील खुला गट), महिला (16 वर्षावरील खुटा गट) असे दोन गट असणार आहेत. या स्पर्धेची सुरूवात ठाणे महानगरपालिका मुख्यालयापासून होणार असून नितिन कंपनी, सर्व्हिस रोड, कोरम मॉल, वर्तकनगर, शिवाईनगर, उपवान तलाव, बिरसा मुंडा चौक, उन्नती गार्डन, शिवाईनगर येथून पुन्हा त्याच मार्गावरुन महापालिका मुख्यालय येथे समाप्त होणार आहे.

प्रथम क्रमांकास १५ हजार रुपये

या स्पर्धेतील पुरूष व महिला या दोन्ही गटातील विजेत्या प्रथम क्रमांकास रुपये 15000/-, द्वितीय रु. 12000/- तृतीय रु 10000/- चतुर्थ रु. 7000/- पाचवे रु. 5000 अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेस जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here