आज म्हणजेच गुरुवार २१ मार्च रोजी मराठवाडा जिल्ह्याची सकाळ भूकंपांच्या धक्क्यांनी झाली. मराठवाड्यातील नांदेड ,परभणी, हिंगोलीमध्ये भूकंपाचे धक्के (Marathwada Earthquake) जाणवले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.
(हेही वाचा – डिजिटल आणि AI च्या साहाय्याने Archives Department चे होणार पुनरुज्जीवन)
४.२ रिश्टर स्केल तीव्रता :
मिळालेल्या माहितीनुसार ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Marathwada Earthquake)
हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे दोन धक्के :
हिंगोली जिल्ह्यात दोन भूकंपाचे धक्के (Marathwada Earthquake) जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात असून ३.६ तर ४.५ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत . सकाळी सहा वाजून नऊ मिनिटाच्या सुमारास भूकंपाचे दोन धक्के जाणवले आहेत.
(हेही वाचा – Lok Sabha Elections 2024 : मुंबईत काँग्रेसला फक्त एकच जागा, उबाठा शिवसेना लढणार पाच जागा?)
आखाडा बाळापूर हा भूकंपाचा केंद्रबिंदू :
या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर आहे. तर भूकंपाची तीव्रता हिंगोली परभणी नांदेड या तीनही जिल्ह्यातील गावांना जाणवली आहे. अनेक घरांच्या भिंतीना छोट्या भेगा गेल्याची माहिती आहे. (Marathwada Earthquake)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community