मार्च महिन्यात 1,60,122 कोटी रुपये जीएसटी संकलित

104

मार्च 2023 मध्ये एकत्रित GST महसूल संकलन 1,60,122 कोटी रुपये आहे. यात CGST 29,546 कोटी रुपये, SGST 37,314 कोटी रुपये, IGST 82,907 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या 42,503 कोटींसह) आणि अधिभार 10,355 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या 960 कोटी रुपयांसह) आहे. चालू आर्थिक वर्षात चौथ्यांदा GST संकलनाने 1.5 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर GST लागू झाल्यापासून दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च संकलन नोंदवले आहे. या महिन्यात आतापर्यंतचे सर्वाधिक IGST संकलन झाले.

सरकारने IGST मधून नियमित थकबाकीपोटी 33,408 कोटी रुपये CGST आणि 28,187 कोटी रुपये SGST ची थकबाकी दिली आहे. मार्च 2023 मध्ये नियमित थकबाकी नंतर केंद्र आणि राज्यांकडून जमा झालेला एकूण महसूल, CGST साठी 62,954 कोटी रुपये आणि SGST साठी 65,501 कोटी रुपये इतका आहे. मार्च 2023 मध्ये जीएसटीपोटी गोळा झालेला महसूल, मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 13% जास्त आहे. या महिन्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत वस्तूंच्या आयातीद्वारे जमा झालेला महसूल 14% जास्त आहे.

(हेही वाचा देशात पुन्हा वाढला कोरोना; एकाच दिवशी ३,८२४ नवे रुग्ण)

मार्च 2023 मधे आतापर्यंतचे सर्वाधिक परतावे दाखल झाले आहेत. मागच्या वर्षीच्या याच महिन्यात अनुक्रमे 83.1% आणि 84.7% च्या तुलनेत मार्च 2023 पर्यंत इनव्हॉइसचे 93.2% विवरण (GSTR-1 मध्ये) आणि 91.4 % परतावे (GSTR-3B मध्ये) दाखल झाले. 2022-23 साठी एकूण सकल संकलन 18.10 लाख कोटी रुपये आहे. तर संपूर्ण वर्षासाठी सरासरी सकल मासिक संकलन 1.51 लाख कोटी रुपये आहे. 2022-23 मध्ये एकूण महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत 22% जास्त होता. आर्थिक वर्ष 2022-23 च्या शेवटच्या तिमाहीत सरासरी मासिक सकल GST संकलन पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत अनुक्रमे 1.51 लाख कोटी रुपये, 1.46 लाख कोटी रुपये आणि 1.49 लाख कोटी रुपयांच्या सरासरी मासिक संकलनाच्या तुलनेत 1.55 लाख कोटी रुपये आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.