पुण्यात Bangladeshi infiltrators च्या हद्दपारीसाठी हिंदू संघटनांचा विराट मोर्चा

124
पुण्यात Bangladeshi infiltrators च्या हद्दपारीसाठी हिंदू संघटनांचा विराट मोर्चा
पुण्यात Bangladeshi infiltrators च्या हद्दपारीसाठी हिंदू संघटनांचा विराट मोर्चा

देशाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक बांगलादेशी घुसखोर (Bangladeshi infiltrators ) हद्दपार करावा आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी पुण्यात हिंदू संघटनांनी भव्य मोर्चा काढला. हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या (Hindu Rashtra Samanvay Samiti ) नेतृत्वाखाली आयोजित या मोर्चात विविध हिंदुत्ववादी संघटनांनी (Hindutva organization) सहभाग घेतला.

( हेही वाचा : Uttar Pradesh मधील अंमली पदार्थ बनविणारा कारखाना साकीनाका पोलिसांकडून उध्वस्त

दरम्यान हिंदु राष्ट्र समन्वय समितीने केंद्र आणि राज्य सरकाराकडे मागणी केली की, संपूर्ण देशभरात ‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम’ राबवून त्यांना शोधून काढावे. घुसखोरांना (Bangladeshi infiltrators ) ताबडतोब देशाबाहेर हाकलावे.बांगलादेशी घुसखोरांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.संशयित भागात कोंबिंग ऑपरेशन राबवून घुसखोर शोधून काढावेत. पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य द्यावे, जेणेकरून ते देशभरातील घुसखोरांचे जाळे उखडून टाकू शकतील.

मोर्चाच्या समारोपानंतर पुण्याच्या निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, ज्यात देशभरातील बांगलादेशी घुसखोर (Bangladeshi infiltrators ) हद्दपारीसाठी कठोर पावले उचलण्याची मागणी करण्यात आली. मोर्चात सहभागी हिंदुत्ववादी संघटनांनी “राष्ट्र की रक्षा हम करेंगे, राष्ट्ररक्षक कहलायेंगे। भगवा थामे संकल्प लिया है, हर बांगलादेशी घुसपेठीया भगायेंगे!” अशा जोरदार घोषणा देत बांगलादेशी घुसखोर हद्दपार करण्याचा निर्धार व्यक्त केला. या घोषणांनी पुण्याच्या रस्त्यांवर हिंदुत्ववादी लाट उमटली.

या विराट मोर्चामध्ये हिंदु राष्ट्र समन्वय समिती (Hindu Rashtra Samanvay Samiti ) , भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, शिवसेना, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान (Shri Shiv Pratishthan Hindustan), हिंदु जनजागृती समिती (Hindu Janajagruti Samiti) यांसारख्या अनेक संघटनांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. तसेच हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट (Sunil Ghanvat) ,हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक पराग गोखले, भाजप रणरागिणी शाखेच्या उज्ज्वला गौड ही या मोर्चात सहभागी झाले होते. (Bangladeshi infiltrators )

हिंदु राष्ट्र समन्वय समितीची भूमिका

मोर्चात बोलताना हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट म्हणाले, “देशभरात बांगलादेशी घुसखोरांचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला आहे. त्यामुळे सामाजिक अस्थिरता, गुन्हेगारी वाढ, आणि रोजगाराच्या संधींवर परिणाम होत आहे. अमेरिकेत ट्रम्प सरकारने अनधिकृत स्थलांतरितांविरोधात कठोर धोरण राबवले. भारतानेही त्याच धर्तीवर तातडीने कठोर कारवाई केली पाहिजे. शेवटचा बांगलादेशी भारताबाहेर जाईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील!” (Bangladeshi infiltrators )

बांगलादेशींना हाकलण्याची १६ मे ही अखेरची तारीख ठरवा – रमेश शिंदे

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) लक्ष्य करत म्हटले की, “२०१४ मध्ये मोदीजींनी सांगितले होते की, १६ मेच्या दिवशी बांगलादेशी घुसखोरांनी आपली बॅग बांधून ठेवावी. मग आता कोणत्या १६ मेची वाट बघायची? वर्ष २०२५ चा १६ मे हा अखेरचा ठरला पाहिजे!”

या विराट मोर्चाच्या माध्यमातून हजारो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बांगलादेशी घुसखोरांना (Bangladeshi infiltrators ) हद्दपार करण्यासाठी कणखर भूमिका घेतली. पुण्यातील हा मोर्चा देशभरातील अशा आंदोलनांसाठी दिशादर्शक ठरण्याची शक्यता आहे. हिंदू संघटनांनी सरकारवर दबाव वाढवण्याची भूमिका घेतली असून, आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.