रुग्णसेवेचा खोळंबा? राज्य निवासी डॉक्टरांनी दिला संपावर जाण्याचा इशारा…

141

राज्यभरातील रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टरांनी २ जानेवारीपासून संपावार जाण्याचा इशारा दिला आहे. सेंट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना पत्र देखील देण्यात आले आहे.

( हेही वाचा : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची तब्येत बिघडली; एम्स रुग्णालयात दाखल )

निवासी डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवेशन काळात गेल्या १ वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य न झाल्यास निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. निवासी डॉक्टर संपावर गेल्यास रुग्णसंख्येवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

निवासी डॉक्टरांच्या मागण्या काय आहेत?

  • वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या १ हजार ४३२ जागांची पदनिर्मिती
  • शासकीय आणि महाविद्यालात अपुऱ्या आणि मोडकळीस आलेल्या वसतीगृहांमध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय होते.
  • सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यापकांची पदे तातडीने भरणे.
  • महाभाई भत्ता तात्काळ देण्यात यावा.
  • वरीष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करत सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करणे
  • या प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील मार्डच्या निवासी डॉक्टरांच्या २ जानेवारीपासून संपाची घोषणा केली आहे. राज्य सरकारने या मागण्यांची पूर्तता न केल्यास मार्डच्या डॉक्टरांनी संपाचा निर्धार केला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.