मार्डच्या इशा-यानंतर राज्यभरातील सात हजार निवासी डाॅक्टर संपावर गेले आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी या डाॅक्टरांनी संप पुकारला आहे. सोमवारपासून सुरु झालेल्या या संपामध्ये अतिदक्षता विभाग वगळता अन्य सर्व विभागांमधील सेवा बंद ठेवण्याचा इशारा मार्डने दिला आहे. दुसरीकडे प्रशासनानेही या संपाच्या पार्श्वभूमीवर तयारी केली आहे. रुग्णांना फटका बसू नये यासाठी मुंबईतील केईएम, नायर, शीव, कूपर आणि जेजे रुग्णालयांमध्ये आवश्यकतेनुसार, अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, सर्व रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभाग सुरु ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईतही या संपाचे पडसाद उमटत आहेत. प्रशासनाच्या जेजे रुग्णालयात तर महापालिकेच्या केईएम, सायन, नायर, कूपर रुग्णालयातील निवासी डाॅक्टरांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. अत्यावश्यक सेवांमधील निवासी डाॅक्टरांची सेवा सुरु असल्याने, तिथल्या रुग्णसेवेवर परिणाम जाणवणार नाही. नायर रुग्णालयासमोर एकत्र येत निवासी डाॅक्टरांनी आंदोलन सुरु केले आहे.
‘या’ मागण्यांसाठी डाॅक्टरांचे कामबंद आंदोलन
वैद्यकीय महाविद्यालयात 1 हजार 400 जागांची भरती करण्यात यावी, वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील वसतिगृह सुधारा, मार्डच्या डॉक्टरांची हेळसांड थांबवा यासह विविध मागण्या साठी डॉक्टर आक्रमक होत त्यांनी ससून हॉस्पिटलच्या गेटवर जोरदार निदर्शने केली.