पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येमध्ये केलेल्या कामाचे मुसलमान (Muslim) महिला मरियम हिने नुसते कौतुक केले. त्यामुळे तिचा पती अर्शदला राग अनावर झाला. त्याने चक्क मरियमला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच तो ना थांबता त्याने तिच्या तोंडावर गरम डाळ फेकली. महिलेने पोलीस तक्रारीमध्ये यासंदर्भातील माहिती दिली.
याप्रकरणी पती आणि कुटुंबातील सात जणांना अटक करण्यात आली आहे.
.#tripletalaq #narendramodi #yogiadityanath #Bharuch #UP #crime #latestupdates #marathinews #hindusthanpostmarathi pic.twitter.com/93ZQsoZW3e— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) August 25, 2024
(हेही वाचा Sexual Assaulted : पुण्यात कीर्ती विद्यालयातील क्रीडा शिक्षकाकडून १२ वर्षीय मुलीचे ४ वर्षे लैंगिक शोषण)
अयोध्येतील विकासावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्तुती केल्यामुळे अर्शदने (Muslim) मारहाण केल्यावर नंतर ट्रिपल तलाक दिला. तसेच या महिलेने सासरच्या लोकांनी मारहाण करत छळ केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केल्यानंतर पोलिसांनी पती आणि त्याचे कुटुंबीय यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २०१७ मध्ये तिहेरी तलाकची पद्धत राज्यघटनाविरोधी ठरवली होती. त्यानंतर जुलै २०१९ मध्ये केंद्र सरकारने तिहेरी तलाकच्या विरोधात कायदा केला.
Join Our WhatsApp Community