नवरात्रीपासून मार्केटमध्ये मोठ्या प्रमणात फुलांची आवक वाढते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांच्या भावात वाढ झाली आहे. दसऱ्याला मागील वर्षी आवक जास्त झालेल्या फुलांचे भाव कमी झाले होते. मात्र यंदा फुलांची आवक साधारण असली तरी दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांनी (Marigold flower) यंदा भाव खाल्ला आहे. झेंडू ८० ते १०० रुपये प्रतिकिलो भाव झाला आहे. झेंडूंच्या फुलांचा भाव वाढल्यामुळे हारांची किंमत सुद्धा वाढली आहे. या वाढलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला असून, शेतकरी राजा सुखावला आहे. (Marigold Price)
साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस म्हणजे दसरा (Dussehra). या सणाला झेंडूच्या फुलांचा आणि आपट्याच्या पानांचा एक वेगळा मान असतो. त्यामुळे यंदाही दसऱ्याच्या निमित्ताने बाजारात झेंडूची फुले आणि आपट्याची पाने मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली होती. मात्र यंदा दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांचा भाव खाल्ला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
दरवाढीचे अशी आहेत कारणे :
– यंदा पावसामुळे फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
– फूल उत्पादक शेतकऱ्यांना वाहतूक दळणवळण खर्च परवडत नाही.
– फूल उत्पादक शेतकऱ्यांना खर्च निघत नसल्याने यंदा दर वाढला
मागील वर्षी मार्केटयार्ड फूल आवारात मोठ्या प्रमाणात फुलांची आवक झाल्याने दर कमी मिळाले तर काही शेतकऱ्यांंना रस्त्यावर फुलं टाकून द्यावी लागली. यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात फुलांची आवक कमी झाली. यामुळे यंदा फुलांच्या दरात वाढ झाली आहे.
(हेही वाचा – UPI Transactions : काय आहे युपीआय व्यवहाराची नवी मर्यादा)
शनिवारी (११ ऑक्टोबर) दसरा असल्याने शुक्रवारी रात्री मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे. सध्या हिंगोली, सोलापूर, साताऱ्यासह कर्नाटकातून ही बाजारात फुले येत असतात. यंदा मात्र भावात वाढ झाली असून, ४० टक्केच आवक झाली आहे. तसेच मार्केटयार्ड फूल बाजारात गुरुवारपासून फुलांची आवक होण्यास सुरुवात झाली असून, गुरुवारी साधारण झेंडूची १०५ टन आवक झाली असून, दर ५० ते १०० रुपये प्रतिकिलो एवढी किंमत आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community