मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 15 मिनिटांत पोहचता येणार; Coastal Road चे झाले उद्घाटन

'कोस्टल रोड' (Coastal Road) ची अंदाजे किंमत सुमारे 14 हजार कोटी रुपये आहे, हा मार्ग वांद्रे-वरळी 'सी लिंक' शी थेट कनेक्टिव्हिटी देणार आहे.

192

आता मुंबईतील ‘कोस्टल रोड’वरून (Coastal Road) तुम्ही उत्तरेकडे जात असाल, तर शुक्रवारपासून तुम्हाला थेट वांद्रे-वरळी ‘सी लिंक’मध्ये प्रवेश करता येणार आहे. होय, शुक्रवार, 13 सप्टेंबरपासून कोस्टल रोड आणि सी लिंक जोडल्यानंतर लोकांना मरीन ड्राईव्हमार्गे वरळीला कोस्टल रोडद्वारे सी लिंक मार्गे वांद्रेपर्यंत सहज पोहोचता येणार आहे.

गुरुवार, 12 सप्टेंबर रोजी या कोस्टल रोडचे (Coastal Road) उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. यापूर्वी १५ ऑगस्टपर्यंत या मार्गाचे उद्घाटन होणार होते, मात्र पाऊस आणि हायटाईडमुळे काम महिनाभर लांबले. मात्र, वरळी पॉइंट माधव ठाकरे चौक ते मरीन ड्राईव्ह या कोस्टल रोडची एक बाजू १२ मार्च २०२४ पासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.

(हेही वाचा राहुल गांधींचा आरक्षणविरोधी चेहरा उघड; अमेरिकेतील वक्तव्याचा Devendra Fadnavis यांनी घेतला समाचार)

‘कोस्टल रोड’ (Coastal Road) ची अंदाजे किंमत सुमारे 14 हजार कोटी रुपये आहे, हा मार्ग वांद्रे-वरळी ‘सी लिंक’ शी थेट कनेक्टिव्हिटी देणार आहे. ज्यामुळे दक्षिण मुंबई आणि उपनगरांमधील प्रवासाचा वेळ कमी होईल आणि प्रवास सुलभ होईल. दक्षिण मुंबईकडून वांद्रेकडे जाणारी वाहने सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत थेट ‘सी लिंक’मध्ये जाऊ शकतात, तर दक्षिणेकडे जाणारी वाहने सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत ‘सी लिंक’मध्ये प्रवेश करू शकतात ‘कोस्टल रोड’च्या टोकांना ‘सी लिंक’ ला जोडले जाईपर्यंत विद्यमान मार्गाचा अवलंब करावा लागेल. टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत असलेल्या या मार्गावरील या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन आहे.

वरळी ते मरीन ड्राईव्हपर्यंतचा दक्षिण-पूर्व भाग ११ मार्चपासून कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे आता चालक मरीन ड्राइव्हवरून वरळीला १५ मिनिटांत पोहोचू शकतात. 10.58 किमी लांबीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे बांधकाम ऑक्टोबर 2018 मध्ये सुरू झाले. कोस्टल रोडचा (Coastal Road) दुसरा भाग सी लिंकला जोडून डिसेंबर 2024 पर्यंत वाहतुकीसाठी खुला होणे अपेक्षित आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.