Marine Drive : क्वीन नेकलेस आता मुंबईकरांना न्याहाळता येणार; १.०७ किलोमीटरचा पदपथ वापरासाठी पूर्ववत

2279
Marine Drive : क्वीन नेकलेस आता मुंबईकरांना न्याहाळता येणार; १.०७ किलोमीटरचा पदपथ वापरासाठी पूर्ववत

मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण असणारा मरीन ड्राईव्हच्या राणीचा रत्नहार (क्वीन नेकलेस) परिसराचा पदपथ पुन्हा एकदा पर्यटकांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाच्या कामासाठी हा पदपथ बंद करण्यात आला होता, त्यामुळे सुमारे १.०७ किलोमीटर लांबीचा पदपथ आता वापरासाठी पूर्ववत करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पर्यटकांसाठी या पदपथाचा पर्यटनासाठी पुरेपूर वापर करता येईल. जी डी सोमाणी चौक ते सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह या दक्षिण ते उत्तर दिशेच्या टप्प्यातील पदपथ आता वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. (Marine Drive)

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) अंतर्गत दुसरा बोगदा १० जून २०२४ रोजी खुला करण्यात आला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात येणार्‍या पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा देण्याच्या दृष्टीकोनातून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी या भागात पर्यटकांसाठी प्रसाधनगृह आणि पदपथ स्वच्छतेसाठी नियमितपणे देखरेख ठेवण्यासाठी सूचना त्यांनी दिल्या आहेत. (Marine Drive)

(हेही वाचा – Narendra Modi: ६० वर्षांत पहिल्यांदाच एखाद्या सरकारने हॅटट्रिक केली, काशीत मोदी म्हणाले…)

मरीन ड्राईव्हच्या (Marine Drive) परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण या प्रकल्पाच्या निमित्ताने करण्यात आले आहे. त्यामुळे १०.५६ मीटर रूंदीचा आणि सरासरी १ किलोमीटर लांबीचा रस्ता प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते मफतलाल क्लब सिग्नल दरम्यान वापरासाठी उपलब्ध झाला आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते उत्तर वाहिनीच्या दिशेला रॅम्पला जोडणारा ४०० मीटरचा अंतराचा रस्ता तयार करण्यात आला आहे. यापूर्वी अस्तित्वातील फूटपाथचा वापर करून त्यावर हा रस्ता तयार करण्यात आला आहे. तसेच त्यापुढील रस्ता माफत लाल सिग्नलपर्यंत असा सरासरी १ किमी लांबीचा नवा रस्ता वापरासाठी उपलब्ध झाला आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उडाणपुलाच्या शेजारच्या या अतिरिक्त सेवा रस्त्याचा उत्तर बोगद्याच्या प्रवेशासाठी वापरता येईल. (Marine Drive)

अतिरिक्त सेवा रस्त्यासोबतच पर्यटकांना पदपथही वापरासाठी पुन्हा एकदा उपलब्ध झाला आहे. या पदपथाच्या शेजारच्या समुद्राच्या भिंतीची उभारणी ही बीम आणि कॉलमचा वापर करून करण्यात आली आहे. त्यामुळे अतिरिक्त भराव न घालताच आतल्या बाजुला हा नवीन पदपथ तयार करण्यात आला आहे. या पदपथाला धडकणाऱ्या समुद्राच्या लाटांचा आघात रोखण्यासाठी टेट्रापॉडचा वापर करण्यात आला आहे. (Marine Drive)

सुसज्ज आसन व्यवस्था

पूर्वीसारखीच पर्यटकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच चालण्यासाठी अधिक दर्जेदार पदपथ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिवाय पदपथांना लागूनच चांगली प्रकाश व्यवस्था तयार करण्यासाठी पथदिवे उभारणी नियोजनाचे काम प्रगतिपथावर आहे. (Marine Drive)

लाटांचा वेग रोखण्यासाठी टेट्रापॉडचा वापर

मरीन ड्राईव्हच्या सी फेस परिसरात धडकणार्‍या लाटांचा वेग आणि आघात रोखण्यासाठी टेट्रापॉडचा वापर किनारपट्टीवर करण्यात आला आहे. संपूर्ण किनारपट्टीवर टेट्रापॉडचा वापर करून लाटांमुळे किनारपट्टीवर होणारा आघात तसेच लाटांचा वेग कमी करण्यासाठी मदत होईल. मरीन ड्राईव्ह किनारपट्टीवर ५९० मीटर भागात टेट्रापॉडचे काम दक्षिण ते उत्तर अशा दिशेत प्रगतिपथावर आहे. (Marine Drive)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.