- सचिन धानजी, मुंबई
मुंबईतील नरिमन पॉईंटपासून वरळीपर्यंत पसरलेल्या समुद्र किनारी लाटांचा मारा करण्यासाठी बसलेले टेट्रापॉड हे जुने झाले असून तब्बल ४० वर्षांपासून जुने झालेल्या या टेट्रापॉडच्या जागी नवीन टेट्रापॉड बसवण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे आता हे जुने टेट्रापॉड काढून त्या जागी तब्बल १०० वर्षे टिकतील अशाप्रकारे नवीन टेट्रापॉड बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. (Marine Drive)
(हेही वाचा – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या Rahul Gandhi यांना महाराष्ट्राने नाकारले!)
सन १९६० ते ६५ मध्ये बसवले होते टेट्रापॉड
मुंबई महापालिकेच्यावतीने मुंबई किनारी रस्ता प्रकल्प अर्थात कोस्टल रोड अंतर्गत प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या वरळी भागाकडील टोक अशाप्रकारे प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम सुरु असताना प्रिन्सेस स्ट्रिट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी पार्क या टप्प्यावर मरीन ड्राईव्ह (Marine Drive) येथील समुद्र किनाऱ्या लगतचे जुने टेट्रापॉड जीर्ण झाल्यामुळे त्याठिकाणी नवीन टेट्रापॉड बसवण्याच्या सूचना करण्यात आली होती. त्यानुसार या प्रकल्प कामासाठी नेमलेल्या सल्लागारामार्फत याचा अहवाल बनवला असून त्यामध्ये मरीन ड्राईव्ह (Marine Drive) येथील टेट्रापॉड हे सन १९६० ते १९६५ या कालावधीत ठेवण्यात आल्याची समोर आली आहे. तसेच त्यातील काही टेट्रापॉड सन १९९८ ते २००२ या कालावधीत बदलण्यात आले होते. सध्या ठेवण्यात आलेल्या टेट्रापॉडचे आयुष्य हे ४० वर्षे मानले गेले आहे. त्यामुळे जे बसवले आहेत त्यातील काही जुने टेट्रापॉडना ६० ते ६५ वर्षे झाले असल्याचे या अहवालात नमुद केले आहे.
(हेही वाचा – Congress आखतेय मोठा डाव, माजी राजदूताचा खळबळजनक दावा)
बहुतेक टेट्रापॉडचा डिझाईन कालावधी संपलेला
महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, टेट्रापॉड ठेवण्याची पद्धत इंटरलॉकींग पद्धतीने असते. त्यामुळे टेट्रापॉड उचलून दुसऱ्या ठिकाणी नेताना तुटण्याचे प्रमाण अधिक असते. तसेच जुन २०२० च्या चक्रीवादळामुळे टेट्रापॉडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. बहुतेक टेट्रापॉडचे डिझाईन कालावधी संपलेला असल्यामुळे तसेच बरेचसे टेट्रापॉडचे निसर्ग वादळ व वाहतुकी दरम्यान नुकसान झालेले असल्यामुळे जुने टेट्रापॉड त्याच ठिकाणी पुन्हा बसविणे योग्य होणार नाही. त्यामुळे नविन टेट्रापॉड जे १०० वर्षाच्या सेवाक्षमतेच्या अधिक ताकदीच्या निकषाची पूर्तता करू शकतील असे ठेवण्यात यावेत असे या अहवाल नमुद केले आहे. (Marine Drive)
(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule यांचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले…)
तटरक्षक भिंतीच्या संरक्षणासाठी…
जुने ट्रेटापॉडचे आयुष्य संपल्यामुळे तसेच बरेचसे टेट्रापॉड तुटल्यामुळे सागरी लाटांचा मारा तसेच मरीन ड्राईव्ह (Marine Drive) किनाऱ्याची तटरक्षक भिंतीच्या संरक्षणाकरिता जुने टेट्रापॉडचा पुर्नवापर करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे नवीन टेट्रापॉड ज्याचे आयुष्यमान १०० वर्षे राहील व मरीन ड्राईव्ह येथील किनारा सुस्थितीत राहण्यासाठी नवीन टेट्रापॉड बसविण्याचे सुचविले असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी महापालिकेने एल अँड टी कंपनीवर याची जबाबदारी सोपवल्याची माहिती मिळत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community