राज्यातील बाजार समिती (Market Committee) यांनी विविध मागण्यांसाठी सोमवारी एक दिवसाचा संप पुकारला असल्याने सोमवारी जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये लिलाव प्रक्रिया ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
(हेही वाचा – illegal number Plate : २८०० वाहनचालकांना दंड, तरीही नंबरप्लेटवर ‘दादा, मामा’!)
राज्यातील बाजार समितीमध्ये (Market Committee) सोमवारी एक दिवसाचा बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय राज्य व्यापी बाजार समिती असोसिएशनने घेतला असून या संपाला संपूर्ण राज्यातील बाजार समिती मधील भाजीपाला व भुसार मालाच्या लिलाव बंद ठेवून आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी राज्यातील लहान मोठ्या सर्व बाजार समित्या (Market Committee) या बंद राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community