सध्या आंतरधर्मीय विववाहाच्या नावाखाली लव्ह जिहादची पाठराखण करणाऱ्या तथाकथित पुरोगाम्यांना मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाने (High Court) जोरदार चपराक लगावली आहे. मुसलमान पुरुषाने हिंदू महिलेशी केलेला विवाह अवैध ठरतो, असा महत्वाचा निर्णय दिला आहे.
काय म्हटले याचिकेत?
वरीलप्रमाणे विवाह करणाऱ्या जोडप्याला विशेष विवाह कायदा, १९५४ च्या अंतर्गत लग्न करताना सुरक्षा पुरविली जाऊ शकत नाही, असे सांगून उच्च न्यायालयाने (High Court) आंतरधर्मीय जोडप्याची याचिका फेटाळून लावली. न्यायाधीश गुरुपाल सिंग अहलुवालिया यांनी ही याचिका फेटाळून लावली. मुस्लीम कायद्यानुसार मूर्तीपूजा किंवा अग्नीपूजा करणाऱ्या मुलीशी मुस्लीम पुरुषाने केलेले लग्न अवैध मानले जाते. त्यांनी विशेष विवाह कायद्याद्वारे जरी लग्न केले तरी ते अवैधच मानले जाईल, असे उच्च न्यायालयाने (High Court) म्हटले आहे.
या प्रकरणात हिंदू मुलीच्या कुटुंबियांनी या लग्नाला विरोध केलेला आहे. हे आंतरधर्मीय लग्न झाल्यास, समाज त्यांना वाळीत टाकेल किंवा दूर लोटेल, अशी भीती मुलींच्या पालकांमध्ये आहे. मुलीच्या पालकांनी आरोप केला की, मुस्लीम मुलाशी लग्न करण्यासाठी बाहेर पडताना मुलीने घरातील दागिने स्वतःबरोबर गोळा करून नेले. जोडप्याच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, हिंदू मुलीला मुस्लीम धर्म स्वीकारायचा नाही, त्यामुळे सदर जोडप्याला विशेष विवाह कायद्याद्वारे लग्न करायचे आहे. तसेच मुस्लीम मुलालाही स्वतःचा धर्म न बदलता लग्न करायचे आहे. त्यामुळे लग्नाची नोंदणी करायला जात असताना जोडप्याला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी जोडप्याच्या वकिलांनी याचिकेद्वारे न्यायालयात केली.
Join Our WhatsApp Community