अलाहाबाद उच्च न्यालयाने हिंदू विवाहाबाबत महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. (Allahabad High Court On Hindu Marriage) सप्तपदी हा हिंदू विवाहाचा अत्यावश्यक घटक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. केवळ रीतिरिवाजांनुसार केलेला विवाह कायद्याच्या दृष्टीने वैध विवाह मानला जाऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. वाराणसीच्या स्मृती सिंह उर्फ मौसमी सिंह यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती संजय कुमार सिंह यांच्या एकल खंडपीठात सुनावणी सुरू होती. न्यायालयाने याचिकाकर्त्याविरुद्ध (स्मृती सिंह यांच्या विरुद्ध) दाखल केलेली तक्रार आणि जारी केलेले समन्स आदेश रद्द केले आहेत. घटस्फोट न देता पुनर्विवाह केल्याचा आरोप करत पती आणि सासरच्या लोकांनी वाराणसी जिल्हा न्यायालयात याचिकाकर्त्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने याचिकाकर्त्याला समन्स बजावले होते. (Allahabad High Court On Hindu Marriage)
(हेही वाचा – Nepal : एकेकाळी हिंदु राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये मुसलमानांचे हिंदूंवर आक्रमण; ‘या’ शहरात लॉकडाऊन)
या तक्रारीला आणि समन्सला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. स्मृती सिंह यांनी सांगितले की, 5 जून 2017 रोजी तिचा सत्यम सिंगसोबत विवाह झाला होता. दोघांचे लग्न जास्त काळ टिकले नाही आणि वादामुळे स्मृती सिंह यांनी पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध हुंडाबळीसाठी छळ, मारहाण आदींचा गुन्हा दाखल केला होता. सासरच्यांनी मारहाण करून घराबाहेर हाकलून दिल्याचा आरोपही तिने केला आहे. (Allahabad High Court On Hindu Marriage)
घटस्फोट न घेता दुसरे लग्न केल्याचा आरोप
पोलिसांनी पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या वेळी पती व सासरच्या मंडळींच्या वतीने पोलिस अधिकाऱ्यांना तक्रार पत्र देण्यात आले आहे. याचिकाकर्त्याने पहिल्या पतीशी घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले आहे, या तक्रारीची चौकशी करून मिर्झापूर पोलिसांनी ती खोटी असल्याचा अहवाल दिला.
न्यायालय काय म्हणाले ?
विवाह सोहळा झाल्याचा कोणताही पुरावा तक्रारीत देण्यात आलेला नाही. तसेच विवाहाचा अत्यावश्यक विधी असलेल्या सप्तपदीचा कोणताही पुरावा नाही. पुरावा म्हणून एकमेव छायाचित्र टाकण्यात आले असून त्यात मुलीचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. न्यायालयाने म्हटले आहे की, याचिकाकर्त्याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीत विवाह सोहळा पार पाडल्याचा कोणताही पुरावा देण्यात आलेला नाही. वैध विवाहासाठी सर्व रीतीरिवाज आणि विधींसह विवाह सोहळा पूर्ण होणे आवश्यक आहे.
हिंदू विवाहाची वैधता ठरवण्यासाठी सप्तपदी हा एक आवश्यक घटक आहे. केवळ याचिकाकर्त्याला त्रास देण्याच्या उद्देशाने भ्रष्ट न्यायिक प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट होते. हा न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग आहे. (Allahabad High Court On Hindu Marriage)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community