आता भंगारातूनही मिळणार कर सवलत!

92

भारतातील स्क्रॅप धोरणाबाबत सरकार सातत्याने मोठी पावले उचलत आहे. या दिशेने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी नोएडा येथील सेक्टर-80 मध्ये स्क्रॅपींग फॅसिलीटेशन सेंटर (जुन्या वाहनांच्या पुनर्वापराचे ) पहिले युनिट सुरू केले. देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती आणि टोयोटा त्‍सुशो ग्रुपने संयुक्‍तपणे हे युनिट उभारले आहे, जेथे दरवर्षी सुमारे 24 हजार जुनी वाहने स्क्रॅपमध्ये बदलली जातील. या प्लांटची दर महिन्याला दोन हजार वाहने स्क्रॅप करण्याची क्षमता आहे आणि एक वाहन स्क्रॅप करण्यासाठी तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागणार आहे. तसेच, भंगारात गाडी दिल्यानंतर नविन गाडी खरेदी करण्यासाठी तुम्हांला कर सवलत दिली जाणार आहे.

उत्पादन खर्च कमी होईल 

या कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी म्हणाले, प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी स्क्रॅपेज धोरण हे प्रमुख घटकांपैकी एक आहे. जुन्या गाड्या नवीन गाड्यांपेक्षा जास्त प्रदूषणाला कारणीभूत असतात, त्यामुळे त्यांना टप्प्याटप्प्याने बाहेर काढण्याची गरज आहे. स्क्रॅप धोरणामुळे विक्री 10-12 टक्क्यांनी वाढेल अशी आमची अपेक्षा आहे. जुन्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते जी समाजासाठी मोठी समस्या आहे. अर्थव्यवस्थेसाठी स्क्रॅपिंग खूप महत्वाचे आहे. त्यामुळे सर्व कच्चा माल कमी किमतीत मिळेल आणि उत्पादन खर्च कमी होईल, असंही गडकरी पुढे म्हणाले.

स्क्रॅपेज प्लांटचे वैशिष्ट्य 

देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान काही वाहन पुनर्वापर किंवा स्क्रॅपिंग केंद्रे सुरू करण्याचा केंद्राचा विचार आहे. या धोरणामुळे जुन्या गाड्या नष्ट करण्याची प्रक्रिया सुलभ तर होईल पण सोबतच अधिक रोजगार निर्माण होतील, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. असं गडकरी पुढे म्हणाले. इतर देशांप्रमाणेच, आम्हाला अशा धोरणाची गरज आहे जिथे वाहनांची फिटनेस दर 3-4 वर्षांनी तपासली जाते. त्यासाठी आपल्याला 15 वर्षे प्रतीक्षा करण्याची गरज नाही. असं मारुति सुझुकी इंडिया लिमिटेडचे एमडी आणि सीईओ केनिची आयुकावा यांनी म्हटलं आहे. 10 हजार 993 चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेल्या टोयोटा त्सुशो ग्रुपची पहिली सरकार-मान्यता मिळालेली स्क्रॅपिंग आणि रिसायकलिंग सुविधा मारुती सुझुकी टोयोत्सू इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारे चालवली जाते. हा प्लांट 44 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने बांधण्यात आला असून हा स्क्रॅपेज प्लांट केंद्र सरकारच्या वाहन स्क्रॅप धोरणाशी सुसंगत आहे.

 ( हेही वाचा :पुन्हा रंगला नवाब मलिक आणि क्रांती रेडकर यांचा सामना )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.