- ऋजुता लुकतुके
मारुती स्विफ्टची (Maruti Swift 2024) चौथ्या पिढीतील कार खास भारतीय बाजारपेठेसाठी बनलीय. येत्या ९ मे ला ती भारतात लाँचही होणार आहे. ११,००० रुपयांपासून कंपनीने गाडीचं बुकिंग सध्या सुरू केलं आहे. २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात या कारचं दर्शन लोकांना झालेलं होतं. गेल्यावर्षी या गाडीच्या टेस्ट ड्राईव्ह भारतीय रस्त्यांवरही सुरू होत्या. अशा चाचण्यांच्यावेळी दिसलेल्या कारवरून ती कशी असेल याचा चांगला अंदाज बांधता येतो. आधीच्या स्विफ्टच्या मानाने नवीन गाडीच्या इंटिरिअरमध्ये बरेच बदल झाले आहेत. (Maruti Swift 2024)
(हेही वाचा- Jharkhand ED Raids: झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई! नोटांचं घबाड बघून अधिकारीसुद्धा चक्रावले)
गाडीतील इन्फोटेनमेंट डिस्प्ले ९ इंचांचा आहे. एशी व्हेंट नवीन आणि जास्त प्रभावी आहेत. डॅशबोर्डही नवीन आहे. गाडीचा लुकही थोडाफार बदलला आहे. जुन्या इंग्लिश गाडीचा व्हिंटेज लुक तिला आहे. खासकरून मागच्या बाजूने. गाडीचं ग्रील बदललंय. बंपरही आधुनिक आहे. शिवाय मागच्या सीटचं दार उघडण्यासाठीचं हँडल आता दरवाजालाच देण्यात आलं आहे. (Maruti Swift 2024)
2024 Maruti Swift Mileage At 25.72 Kmpl (3.3 Kmpl More Than Old Swift) – 6 Airbags Standard https://t.co/oflYKmClFl pic.twitter.com/EnB4RoO8jM
— RushLane (@rushlane) May 2, 2024
चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गाडीत ६ एअरबॅग आहेत. चालकाच्या सुरक्षेसाठी एबीएस प्रणाली आहे. तर मुलांच्या सीटसाठीही विशेष सुरक्षा आहे. नवीन स्विफ्टचं इंजिनही बदलण्यात आलंय. नवीन गाडीत आहे १.३ पेट्रोल इंजिन, ज्याला ३ सिलिंडर जोडण्यात आलेत. ५ स्पीड मॅन्युअल तसंच ऑटोगिअर बॉक्सचा पर्याय तुम्हाला देण्यात आलाय. भारतात एप्रिल महिन्यात नवीन स्विफ्ट लाँच होऊ शकते. (Maruti Swift 2024)
(हेही वाचा- Lexus UX : मर्सिडिजला टक्कर देणारी लेक्सस कंपनीची ही हायब्रीड एसयुव्ही पाहिलीत का? )
गाडीची किंमत ६ लाख रुपयांपासून सुरू होईल. या गाडीची स्पर्धा असेल ती ह्युंदे आय१० निऑसशी. (Maruti Swift 2024)