गढिया चिंतामणी गावामध्ये सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदेशीररित्या मशीद (Masjid) आणि ईदगाह बांधल्याचे प्रकरण समोर आले आहे. या विरोधात तक्रार करणार्या हिंदूला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या नावाने धमकावण्यात येत आहे. रस्त्याच्या कडेला ही मशीद बांधण्यात आली आहे. राज्यात समाजवादी पक्षाचे सरकार असतांना ही बांधकामे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी माजी गावप्रमुख इस्लाम अन्सारी यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. प्रशासन या प्रकरणाचा तपास करत आहे.
गावातील रवींद्र शाही यांनी या संदर्भात प्रशासनाकडे तक्रार केली आहे. या धार्मिक स्थळांमुळे नागरिकांना ये-जा करतांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप शाही यांच्यासह इतर अनेक ग्रामस्थांनी केला आहे. रवींद्र शाही यांच्या म्हणण्यानुसार जेव्हापासून त्यांनी या बेकायदेशीर बांधकामांविषयी तक्रार केली, तेव्हापासून त्यांना त्यांच्या कुटुंबासह जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. दाऊद इब्राहिमच्या नावाने या धमक्या दिल्या जात आहेत. सामाजिक माध्यमांतून ही धमकी देण्यात आली आहे. (Masjid)
Join Our WhatsApp Community