शिर्डीत साई भक्तांसाठी पुन्हा मास्कसक्ती! मंदिर प्रशासनाने जारी केले नवे नियम…

134

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रार्दूभाव वाढल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काही दिवसात चीनमध्ये कोरोनाची लाट येईल त्यासाठी अलर्ट रहा, कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे असा इशारा चीनमधील तज्ज्ञांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आता जगभरात विशेष उपाययोजना करण्यात येत आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात टास्क फोर्स गठीत करणार असल्याची माहिती दिली आहे.

( हेही वाचा : विधानसभा अध्यक्षांबाबत अपशब्द; अधिवेशन संपेपर्यंत जयंत पाटलांचे निलंबन )

या दृष्टीने आता शिर्डीतल्या साईबाबा संस्थानाने सुद्धा सतर्कतेचे उपाय सुरू केले आहेत. साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी साईबाबा संस्थानने विशेष नियमावली जारी केली आहे.

साई भक्तांसाठी नियम

  • दर्शनाला येणाऱ्या साई भक्तांनी मास्कचा वापर करावा.
  • सोशल डिस्टनसिंगसह सॅनिटायझरचा वापर करावा.
  • ज्यांनी बूस्टर डोस घेतले नसतील त्यांनी त्वरीत घ्यावेत.
  • कोविडचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी.
  • साई संस्थाने प्रभारी कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी हे आवाहन केले आहे. त्यामुळे आता शिर्डीला दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.