सोलापूरच्या अक्कलकोट रोड MIDCतील रबर कारखान्याला भीषण आग; अग्निशमन दलाच्या ५०हून अधिक गाड्या घटनास्थळी

135

सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीतील गुजरात रबर कारखान्याला मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याचे समोर आले आहे. ५० हून अधिक अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. संबंधित कारखान्यातील संपूर्ण सामान जळून खाक झाले आहे.

माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री २ ते ३ वाजल्याच्या सुमारास अक्कलकोट रोड एमआयडीसीतील गुजरात रबर कारखान्याला भीषण आग लागली. या भीषण आगीमुळे संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. तसेच ही आग इतकी भीषण होत की, आसपासचे कारखाने या आगीच्या भक्षस्थानी आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्व अग्निशमन दलातील गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच खासगी पाण्याचे टँकरही मागवण्यात आले आहेत. मध्यरात्रीपासून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून काही प्रमाणात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. रबर कारखाना असल्यामुळे आगीचे स्वरुप खूप मोठे असल्याचे अग्निशमन दलाच्या प्रमुख केदारनाथ आवटेंकडून सांगण्यात आले.

(हेही वाचा – मालाड मधील महालकारी रस्त्यांचे रुंदीकरण : तब्बल २७ बांधकामे हटवली)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.