Tamil Nadu hospital Fire : तामिळनाडूमध्ये रुग्णालयाला भीषण आग; अल्पवयीन मुलासह ७ जणांचा मृत्यू, Video व्हायरल

44
Tamil Nadu hospital Fire : तामिळनाडूमध्ये रुग्णालयाला भीषण आग; अल्पवयीन मुलासह ७ जणांचा मृत्यू, Video व्हायरल
Tamil Nadu hospital Fire : तामिळनाडूमध्ये रुग्णालयाला भीषण आग; अल्पवयीन मुलासह ७ जणांचा मृत्यू, Video व्हायरल

तामिळनाडूच्या (Tamil Nadu) डिंडीगुलमध्ये (Dindigul) गुरुवारी (१२ डिसेंबर) रात्री भीषण आग (Tamil Nadu hospital Fire) लागली. ही आग एका खासगी रुग्णालयाला (hospital Fire) लागली. या आगीत सात जणांचा मृत्यू झाला. अनेकजण जखमी असल्याची देखील माहिती आहे. आगीतील मृतांपैकी एका बालकाचा देखील समावेश आहे. आगीतील जखमींमधील तीन जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची देखील माहिती मिळतेय. डिंडीगुल जिल्हातील तिरुची रोडवर असलेल्या रुग्णालयात ही आग लागली. (Tamil Nadu hospital Fire)

हेही वाचा-मुंबईकरांना जशी मुंबई पाहिजे तशी मुंबई देणार; Eknath Shinde यांचं आश्वासन

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाकडून लगेचच बचावकार्य सुरू करण्यात आले. रुग्णालयातून शंभरपेक्षाही अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत आग चांगलीच वाढली होती. जखमींना लगेचच दुसऱ्या रुग्णालयात हलव्यात आले. सुरूवातीला रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली. मात्र, त्यानंतर आग इतकी जास्त वाढली की, संपूर्ण रुग्णालयात ही आग पसरली. (Tamil Nadu hospital Fire)

हेही वाचा-NIA Raid : एनआयए चे देशभरात छापेमारी, भिवंडीसह राज्यातून तीन संशयित ताब्यात

बचाव पथकाकडून किमान ३० रूग्ण आणि डॉक्टरांना इमारतीमधून बाहेर काढण्यात आले. रुग्णालयातून बाहेर काढण्यात आलेल्या सर्वांना जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. या दुर्घटनेनंतर सहा जण हे इमारतीच्या लीफ्ट मध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडल्याची माहिती पोलीस आणि अग्निशमन विभागाने दिली आहे. दरम्यान या आगीच्या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून यामध्ये रुग्णालयाच्या इमारतीतून आग आणि धूर निघताना दिसत असून यावेळी घटनास्थळी अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या दिसत आहेत. (Tamil Nadu hospital Fire)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.