खालापूर तालुक्यातील रसायनी औद्योगिक वसाहतीमधील कैरे गावातील SPR या फार्मा कंपनीला आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. आगीने रौद्र रूप धारण केलं असून ही कंपनी सिप्ला या कंपनीसमोर आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तसंच या भीषण आगीत कोणती जीवितहानी झाली की नाही बाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही.
पाताळगंगातील कंपनीत भीषण आग
खालापूरच्या पाताळगंगा एमआयडीसीतील एसपीआर कंपनीत अचानक आग (Fire) लागल्यानंतर आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. खोपोली नगरपालिका, पाताळगंगा एमआयडीसी आणि रिलायन्स कंपनी यांच्या फायर ब्रिगेड टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनास्थळी पनवेल महानगरपालिका फायर ब्रिगेडची टीमदेखील पोहचली आहे. मात्र अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही. आग (Fire) नियंत्रणात येत नसल्याने खोपोली औद्योगिक वसाहतीमधील अन्य कंपन्यातील अग्निशमनदलाच्या गाड्या रवाना झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
(हेही वाचा New Edward Bakery बेकरीच्या पावामध्ये सापडली स्टेपलरची पिन)
आगीनंतर या परिसरात धुराचे मोठे लोट पसरले आहेत. आगीचे, धुराचे लोट लांबपर्यंत परिसरात पसरले असून यावरुन या आगीची भीषणता समजू शकते. SPR या फार्मा कंपनीत कॉस्मेटिक तयार करण्यासाठी लागणारे रॉ मटेरियल आणि औषधांचं रॉ मटेरिअल बनवलं जातं होतं. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र या आगीत (Fire) कंपनीतील जवळपास सर्वच सामान जळून खाक झालं आहे. कंपनीच्या आवारात असलेले केमिकलने भरलेले ड्रम मॅन्युअली घेण्याचं काम जलद गतीने सुरू आहे, जेणेकरून पुढील नुकसान टळू शकेल. आग वाढत चालल्याने JSW कंपनी, पनवेल महानगर पालिका आणि अन्य अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आहे.
Join Our WhatsApp Community