Fire News : भायखळ्यातील ५७ मजली इमारतीला भीषण आग ; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी

104
Fire News : भायखळ्यातील ५७ मजली इमारतीला भीषण आग ; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी
Fire News : भायखळ्यातील ५७ मजली इमारतीला भीषण आग ; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी

भायखळा (Byculla) येथील बी. ए मार्गावरील न्यू ग्रेड इंस्टा मिल जवळच्या एका बहुमजली इमारतीला शुक्रवारी (28 फेब्रु.) सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक आग (Fire News) लागली. सद्यस्थितीत अग्निशमन दलाचे (Fire brigade) जवान या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत. (Fire News)

हेही वाचा-Raigad fishing boat fire : अलिबाग समुद्रात मच्छीमार बोटीला लागली आग ; बोटीत 18 ते 20 खलाशी

भायखळ्यातील सालसेट या ५७ मजली इमारतीच्या ४२ व्या मजल्यावर आग (Fire News) लागली आहे. या आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. आग लागल्याचे समजताच इमारतीतील रहिवाशांना सुरक्षेच्या कारणास्तव इमारतीतून पळ काढला. तसेच, दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. (Fire News)

हेही वाचा- Champions Trophy 2025 : बी गटांत उपान्त्य फेरीसाठी चुरस, अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियाचा खेळ बिघडवणार का?

आगीची वाढती तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलातर्फे आगीला १० वाजून ४२ मिनिटांनी क्रमांक एकची वर्दी देण्यात आली. सद्यस्थितीत आगीची धग वाढत असून अग्निशमन दलातर्फे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Fire News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.