दक्षिण मुंबईतील मरीन लाईन्स (Marine Lines) परिसरातील एका निवासी इमारतीत शनिवारी (22 फेब्रु.) दुपारी भीषण आग लागली. मुंबई (Mumbai) हॉस्पिटलपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मरीन चेंबर (Marine Chamber) इमारतीत ही आग लागली असून अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. (Marine Lines)
#WATCH | Maharashtra: Fire breaks out on the top floor of a building Near Gol Masjid, Marine lines, South Mumbai. Several fire tenders have rushed to the spot. No injuries have been reported. pic.twitter.com/0pOHeiBLNL
— ANI (@ANI) February 22, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा आणि गोल मस्जिद इथून जवळच असलेल्या एका इमारतीत दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेनं परिसरात मोठा गोंधळ उडाला. प्रसंगावधान दाखवत काही नागरिकांकडून याबाबतची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून सध्या ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. (Marine Lines)
आगीची तिव्रता वाढली असून आगीच्या ज्वाला सदनिकेच्या खिडकीतून बाहेर येत आहेत. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, पाण्याचे पाच मोठे टँकर घटनास्थळी रवाना झाले आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. सदर इमारतीला आग नेमकी कशामुळे लागली, याबाबतची माहिती अद्याप समोर आली नसून या घटनेची नोंद करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे. (Marine Lines)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community