रविवार, २९ डिसेंबरला बोईसर तारापूर एमआयडीसीत (MIDC) भीषण आग लागल्याची घटना घडली. बोईसरच्या सालवड शिवाजी नगर परिसरातील कारखान्याला भीषण आग लागली. बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर के-6 मधील युके ॲरोमॅटिक अँड केमिकल्स या कारखान्याला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
दरम्यान, अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे सर्थीचे प्रयत्न सुरू झाले. रविवारी या कारखान्यातील कामगारांना सुट्टी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला, मात्र ही आग कशामुळे लागली हे कारण अजूनह अस्पष्ट आहे. हा केमिकलचा कारखाना असल्यामुळे आग झपाट्याने पसरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही आग इतकी भीषण आहे की आगीचे आणि धुराचे लांबच लांब लोळ लांबूनही दिसत होते. (MIDC)
(हेही वाचा काँग्रेसने माजी पंतप्रधान P. V. Narasimha Rao यांच्या पार्थिव शरीराचा केलेला अवमान; वाचा एक क्लेशदायक कहाणी…)
दोन कंपन्या आगीच्या भक्षक स्थानी
बोईसर तारापूर एमआयडीसीतील (MIDC) यु के ॲरोमॅटिक अँड केमिकल कंपनीला लागलेल्या आगीचा भडका वाढला. कंपनी शेजारी असलेल्या श्री केमिकलला देखील आग लागली. दरम्यान, अग्निशमनदलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुदैवाने आगीनंतर कामगारांनी पळ काढल्याने मोठी जीवितहानी टळली. दोन्ही कंपन्यांमध्ये कामगार अडकले नसल्याची प्रशासनाची प्राथमिक माहिती आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू झाले.
Join Our WhatsApp Community