पवई येथील आग विझत नाही तोपर्यंत मुंबईत गुरुवारी अंधेरी परिसरातही आग लागल्याची घटना घडली. अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी (MIDC) परिसरात गुरुवारी दुपारी दोन वाजता भीषण आग लागली. दोन मजली इमारतीच्या गाळ्यात ही आग लागली. आगीची तीव्रता जास्त असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या आणि पाण्याचे आठ मोठे ट्रॅंकर घटनास्थळी आहेत.
(हेही वाचा Narco Terrorism देशासाठी धोकादायक; तरुण पिढीचे रक्षण करण्याची गरज; समीर वानखेडे यांनी केले प्रबोधन)
मुंबईत दिवसभरात आगीच्या दोन घटना घडल्या. पवई येथील गगनचुंबी इमारतीत लागलेली आग पूर्णत: विझत नाही तोच अंधेरीतील एमआयडीसी (MIDC) परिसरात दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. अंधेरी पूर्वेकडील महाकाली गुंफा मार्गावर शांती नगर परिसरात न्यू इंडस्ट्रीअल इस्टेटमध्ये एका दुमजली बांधकामात ही आग लागली होती. दुमजली बांधकामातील एका गाळ्यात ही आग लागली होती. एक हजार चौरस फूट परिसरात ही आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाबरोबरच, पालिकेच्या विभाग कार्यालयाचे कर्मचारी, पोलीस यंत्रणा दाखल झाली आहे. अग्निशमन दलाचा मोठा ताफा आणि रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. (MIDC)
Join Our WhatsApp Community