Fire : हिरापन्ना मॉलमध्ये भीषण आग 

120

मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम येथील हिरापन्ना मॉलला शुक्रवार, २२ सप्टेंबर रोजी भीषण आग (Fire) लागली. दुपारी ३.१५ च्या सुमारास ही आग लागली. आग इतकी मोठी आहे की धुराचे लोट दूरवरुनही दिसत आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाकडून आगीवर (Fire) नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या पोहोचल्या आहेत. तसेच मुंबई पोलीस आणि रुग्णवाहिका देखील पोहोचली आहे. मॉलमध्ये कुणी नागरिक अडकले आहेत का? याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. ही आग लेव्हल ३ ची असून अद्याप कुणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.

(हेही वाचा MLA Disqualification : १६ आमदारांच्या अपात्रतेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.