मुंबई विमानतळ ठप्प, कारण…

164

जगातील सर्वाधिक व्यस्त अशी ओळख असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व कामकाज व व्यवहार गुरुवार, १ डिसेंबर रोजी ठप्प झाल्याची माहिती मिळत आहे. विमानतळाचे सर्व्हर पूर्णपणे डाऊन झाल्याने प्रवासी डेटासंबंधी संपूर्ण काम थांबले आहे. काम ठप्प झाल्याने प्रवाशांची तपासणी, बॅगेज काऊंटर, चेक इन, बोर्डिंग पास देणे सारे काही थांबले आहे. यामध्ये सायबर हल्ल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

फ्लाइट टेकऑफचे वेळापत्रकही बिघडले

मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 वर संगणक प्रणाली क्रॅश झाल्यामुळे चेक-इनला उशीर होत असल्याने लांबच लांब रांगा लागल्या आहेत, ज्यामुळे फ्लाइट टेकऑफचे वेळापत्रकही बिघडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन टर्मिनलपैकी एक, T2 मुख्यतः आंतरराष्ट्रीय उड्डाणे हाताळते परंतु देशांतर्गत मार्गांसाठी देखील आहे.

अनेक ट्विटर युजर्सनी गर्दीचे फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी एकाला एअर इंडियाने उत्तर दिले. “आमची टीम गैरसोय कमी करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करत आहे.”

(हेही वाचा ‘रावण’ म्हणून टीका करणा-या खरगेंना पंतप्रधान मोदींनी दिले उत्तर, म्हणाले…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.