Matang Community : मातंग समाजाच्या मागण्या मान्य केल्यामुळे उपोषण  तात्पुरते स्थगित 

153
Matang Community : मातंग समाजाच्या मागण्या मान्य केल्यामुळे उपोषण  तात्पुरते स्थगित 
Matang Community : मातंग समाजाच्या मागण्या मान्य केल्यामुळे उपोषण  तात्पुरते स्थगित 
मातंग समाजाच्या (Matang Community) विविध प्रलंबित मागण्या बाबत सरकारने गांभीर्याने विचार करत अधिवेशन काळत सकारात्मक प्रतिसाद देत मागण्या मान्य केल्याची केल्यामुळे मातंग समाज (Matang Community) आनंदोत्सव साजरा करत आहे. मात्र सरकारने याबाबत त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी मातंग समाज करत आहे. (Matang Community)
जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) स्थापन झाली पाहिजे. मातंग समाजाला (Matang Community) ८% आरक्षण (8% reservation) मिळाले पाहिजे या मागण्यासाठी आझाद मैदानात (azad maidan) १८ जानेवारी पासून आमरण उपोषण केल्यामुळे सरकारने या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली असल्यामुळे आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे.
सरकारने जर या मागण्यांबाबत लवकरात लवकर अंमलबजावणी केली नाही तर आंदोलन पुन्हा करण्यात येणार असल्याची मातंग क्रांती (Matang revolution) महामोर्चा महाराष्ट्र (Maharashtra) यांच्या कोअर कमिटी ने  मुंबई मराठी पत्रकार संघ (Mumbai Marathi Journalists Association) येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. (Matang Community)
मातंग क्रांती (Matang revolution) महामोर्चा महाराष्ट्र (Maharashtra) यांच्या वतीने  समाजीक उन्नतीकरिता प्रमुख विकासाच्या विविध मागण्या घेऊन गेली अनेक वर्षे अत्यंत संविधानीक पध्दतीने संघटना लढा लढत असून वेळोवेळी आमरण उपोषणाची हाक देण्यात आली होती. सरकारने आता गांभीर्याने अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) स्थापनेची घोषणा केली आहे. याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी मागणी कोर कमिटी चे अशोक ससाणे , सुनिता तुपसौंदर्य, आवण नाटकर, विकास तांबे, देवेंद्र खलसे,मोहन राव, राजेंद्र साठे, सुदाम आवाडे,शामराव सकट यांनी पत्रकार परिषदेत केली. (Matang Community)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.