-
मुंबई विशेष प्रतिनिधी
मुंबई महापालिकेच्या रुग्णलयांमध्ये विद्युत सुरक्षेच्यादृष्टीने आरोग्य सेवा सुविधांकडे वीज पुरवठ्याचे दोन स्वतंत्र स्त्रोत उपलब्ध करून देणे आवश्यक असताना आजही प्रसुतीगृहांमध्ये अशाप्रकारे पर्नायी विजेची सुविधा नाही. त्यामुळे सार्वजनिक विद्युत पुरवठ्यासोबतच जनरेटर (Generator) तथा युपीएस प्रणाली (UPS system) बसवण्याची आवश्यकता विचारात घेता मोठ्या रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये आदींठिकाणी आहे. परंतु प्रसुतीगृहांमध्ये स्वतंत्र प्रणाली नसल्याने पूर्व उपनगरांतील प्रसुतीगृहांमध्ये पर्यायी विजेसाठी जनरेटर तथा युपीएस प्रणाली बसवली जाणार आहे. (Maternity Hospital)
(हेही वाचा – Punjab मधून २ खलिस्तानवादी दहशतवाद्यांना अटक; आयईडी बॉम्बसह आरडीएक्स जप्त)
पूर्व उपनगरांतीतील विविध महापालिका रुग्णालयातील विविध ठिकाणी विद्युत पॅनल्स (Electrical Panels) बसवण्यात आली आहे. विद्युत सुरक्षेचे महत्व लक्षात घेता आरोग्य सेवा सुविधांकडे वीज पुरवठ्याचे दोन स्वतंत्र स्त्रोत असतात. जसे की सार्वजनिक विद्युत पुरवठा, जनरेटर आणि युपीएस प्रणाली. अशाप्रकारची सुरक्षाबाबतची कामे केल्यानंतर सार्वजनिक वीज बिघाड झाल्यास वैद्यकीय विद्युत उपकरणे निकामी होत नाहीत. ज्यामुळे रुग्णांच्या जिवाचा धोका टळतो असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. (Maternity Hospital)
(हेही वाचा – …तरीही Tanker चालकांचा संप कायम, महापालिकेने उचलले हे कडक पाऊल)
त्यामुळे पूर्व उपनगरांतील प्रसुतीगृहांमध्ये विजेच्या दोन स्वतंत्र वापराबाबत निविदा मागवण्यात आली असून यामध्ये ओमेक्स कंट्रोल सिस्टीम कंपनीची निवड करण्यात आली असून यासाठी विविध करांसह सुमारे चौदा कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. मुख्य वितरण प्रणालीपासून विद्युत सुरक्षा स्त्रोत फीडिंग अत्यावश्यक भारांमध्ये स्वयंचलित बदल करण्याच्या सुविधेसाठी वितरण प्रणालीची रचना आणि स्थापना केली पाहिजे. या स्वयंचलित चेंज ओव्हर उपकरणाला प्रणालीमध्ये सुरक्षित वर्गीकरण करणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रसुतीगृहांमध्ये अशाप्रकारची प्रणाली बसवली जाणार असून ज्यामुळे विद्युत पुरवठ्यात बिघड झाल्यास कोणतेही वैद्यकीय उपकरण निकामी तथा नादुरुस्त होणार नाही,असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Maternity Hospital)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community