माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या कामगार, गृह, पणन-सहकार, नगरविकास, महसूल आणि अन्य खात्याअंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे महाराष्ट्र शासन आणि संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील माथाडी कामगारांचा बुधवारी, १ फेब्रुवारीला लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे.
माथाडी कामगारांच्या नेमक्या मागण्या काय?
बाजार समित्यांमधील माथाडी, मापाडी कामगारांची लेव्हीच्या प्रश्नाची सोडवणूक व्हावी. शासन निर्णयानुसार खासगी बाजार समितीमधील माथाडी अनुषंगीक कामे बाजार समितीचे परवानेधारक व मंडळाच्या नोंदीत कामगारांना कामे मिळावीत. माथाडी, मापाडी कामगार भरतीबाबत कामगार विरोधी आदेश रद्द करावेत. बाजार समितीमध्ये राजीनामा दिलेल्या माथाडी, मापाडी कामगारांच्या जागी नवीन कामगारास बाजार समितीचा परवाना घेण्याबाबत येणाऱ्या अडचणींची सोडवणूक व्हावी. शासकीय गोदामा संदर्भात सुधारित थेट वाहतुक पध्दतीमध्ये शासनाचे धोरण निश्चित होणे आवश्यक आहे. तसेच नाशिकरोड रेल्वे मालधक्यावर कामे करणाऱ्या माथाडी कामगारांना प्लॅटफॉर्मची दुरुस्ती या प्राथमिक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात या प्रमुख मागण्या आहेत.
(हेही वाचा – म्हाडाच्या कारभारावर आता राज्य सरकारचा ‘वॉच’)
माथाडी कामगारांच्या शासनाच्या विविध विभागाअंतर्गत असलेल्या न्याय प्रश्नांची सोडवणुक करण्याकडे तातडीने लक्ष दिले जावे, अन्यथा माथाडी कामगारांना तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा घेणे भाग पडेल, असा इशाराही माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community