माथेरानच्या मिनी ट्रेनला पर्यटकांची पसंती; मध्य रेल्वेच्या तिजोरीत १ कोटींहून अधिक उत्पन्नाची भर

माथेरान हे मुंबईतील नागरिकांसाठी सर्वात जवळचे आणि सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. मध्य रेल्वेच्या अमन लॉज आणि माथेरान दरम्यान चालवल्या जाणाऱ्या शटल सेवेला प्रवाशांची पसंती मिळाली आहे. माथेरान मिनी ट्रेनमधून एप्रिल ते ऑगस्ट २०२२ या पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल दीड लाखांहून अधिक पर्यटकांनी सफर केली आहे. यामुळे मध्य रेल्वेला सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे.

पर्यटकांना आरामदायी प्रवास देण्याबरोबरच, ही शटल सेवा स्वस्त आणि जलद साहित्याची वाहतूक करण्यासही मदत करते. यामुळे एप्रिल ते ऑगस्ट 2022 या कालावधीत 1 कोटी 12 लाख महसूल मध्य रेल्वेला प्राप्त झाला आहे, यामध्ये 1 कोटी 12 लाख कोटी प्रवासी महसूल आणि 92 हजार 254 पार्सल महसूल समाविष्ट आहे. त्या तुलनेत एप्रिल ते ऑगस्ट 2021 या कालावधीत 32 लाख 43 हजारांचा प्रवासी महसूल आणि 43 हजार 566 रुपये पार्सल महसूल मिळाला.

संपूर्ण मार्गावर मिनी ट्रेन 

मध्य रेल्वेने हे ठिकाण केवळ एक प्रमुख पर्यटन स्थळच नाही तर निसर्गाच्या सान्निध्यातील ठिकाण म्हणूनही लोकप्रिय केले आहे. पावसाळ्यानंतर नेरळ ते अमन लॉज मार्गावर 20 किलोमीटरपर्यंत नवीन रुळांचे काम हाती घेण्यात आले असून अपघात होऊ नये यासाठी रुळांच्या बाजूला उपाययोजनाही करण्यात येत आहेत. ही कामे पूर्ण करून नेरळ-माथेरान संपूर्ण मार्गावर डिसेंबर २०२२ पासून मिनी ट्रेन सेवा सुरू करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here