नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक जवळच्या पर्यटन स्थळांना भेटी देतात. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माथेरान या पर्यटनस्थळी लागोपाठ सुट्ट्या आल्या की, पर्यटकांची मोठी गर्दी होते. डिसेंबर महिना आणि नववर्षा यामुळे माथेरानच्या पर्यटक संख्येत सध्या कमालीची वाढ झालेली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी माथेरान ते अमन लॉजदरम्यान ४ विशेष मिनी ट्रेन फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
( हेही वाचा : नववर्षाचे गिफ्ट! रेल्वेत ४१०३ जागांसाठी बंपर भरती, असा करा अर्ज )
मिनी ट्रेनच्या विशेष फेऱ्या
३१ डिसेंबर आणि नववर्षात १ व २ जानेवारीला पर्यटकांसाठी मिनी ट्रेनच्या ४ विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. खास पर्यटकांसाठी ही सेवा देण्यात आली आहे अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. माथेरानला २५ डिसेंबरपासूनच पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक थंड हवेच्या ठिकाणी जाण्यास पसंती देतात.
पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Join Our WhatsApp Community