जगभरात एका बाजूला नव्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने थैमान घालायला सुरूवात केली असतानाच मुंबईच्या बाजूला असलेल्या भिवंडी परिसरात वृद्धाश्रमातील 69 वृद्धांना कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
100 हून अधिक व्याधीग्रस्त वयोवृद्ध राहतात.
भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमातील तब्बल 69 वृद्धांना कोरोनाची लागण झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या सर्व वृद्धांना ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खडवली येथील नदीकिनारी हे वृद्धाश्रम आहे. इथे 100 हून अधिक व्याधीग्रस्त वयोवृद्ध राहतात. मागील आठवड्यात या ठिकाणी काही जणांना ताप येत होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यातील एका वृद्धाचा ताप कमी न झाल्याने त्यांची कोरोना चाचणी केली. चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह निघाल्याने खबरदारी म्हणून वृद्धाश्रम व्यवस्थापनाने सर्वांचीच चाचणी केली. सर्वांची चाचणी केल्यानंतर त्यापैकी तब्बल 69 वृद्धांना कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
(हेही वाचा मंत्री आव्हाड म्हणतात, पान सुपारी, गुटखा, पान मसाला खा!)
राज्य सतर्क
दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा घातक व्हेरिएंट आढळून आला आहे. त्यामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारची यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे कोविडचे नियम पाळण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. जर कुणी कोरोनाची नियमावली भंग केली तर दंड भरावा लागणार आहे. राज्यात कोविड-19 या आजाराचे रूग्ण कमी झाल्यामुळे राज्य शासनाने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी शिथिल केले आहेत.
Join Our WhatsApp Community