Maulana Sajid Rashidi यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान; म्हणाले, मराठा राजांना मारून…

213
Maulana Sajid Rashidi यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान; म्हणाले, मराठा राजांना मारून...
Maulana Sajid Rashidi यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान; म्हणाले, मराठा राजांना मारून...

समाजवादी पक्षाचे राज्यसभा सदस्य रामजीलाल सुमन (Ramji Lal Suman) यांनी राजपूत योद्धा राणा सांगा यांच्यावरील वादग्रस्त विधानमुळे राजस्थानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता दिल्लीतील ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी (Maulana Sajid Rashidi) यांनीही या मुद्द्यावर वादग्रस्त विधान केले आहे.

( हेही वाचा : मुंबई, नवी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात मशिदीच्या नावाखाली Land Jihad चा डाव)  

एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी (Maulana Sajid Rashidi) म्हणाले की, शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj ) अनेक मराठा राजांना मारून त्यांचे राज्य काबीज केले होते. शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) इतके महान मानले जाते पण इतके मोठे काम त्यांनी केले नाही. बाबरला महाराणा सांगा यांनी भारतात आणले आणि महाराणा सांगा यांनी अनेक राजपूत राजांना मारले, असेही रशिदी (Maulana Sajid Rashidi) म्हणाले.

रामजी लाल यांचे विधान काय होते?

राज्यसभेत समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन (Ramji Lal Suman) म्हणाले होते की, भाजपच्या लोकांमध्ये बाबरचा डीएनए आहे. पण मला जाणून घ्यायचे आहे की बाबरला भारतात कोणी आणले? इब्राहिम लोदीला (Ibrahim Khan Lodi) हरवण्यासाठी राणा सांगाने बाबरला भारतात आणले. जर मुस्लिम बाबरची मुले असतील तर तुम्ही त्या देशद्रोही राणा सांगाची मुले आहात.”, असे वादग्रस्त विधान रामजीलाल (Ramji Lal Suman) यांनी केली.

अमित मालवीय यांची अखिलेश यादव यांच्यावर टीका  

भाजप नेते अमित मालवीय यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि ट्विटरवर लिहिले की, “तुष्टीकरणात रमणारे सपा प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav), महान योद्धा राणा सांगा यांना देशद्रोही म्हणण्यात त्यांचे खासदार रामजी लाल यांना पाठिंबा देत आहेत. हा केवळ राजपूत समुदायाचाच नाही तर संपूर्ण हिंदू (Hindu) समुदायाचा अपमान आहे. महाकुंभावर केल्या जाणाऱ्या वादग्रस्त विधानांनंतर आता सपाच्या हिंदूविरोधी मानसिकता समोर आली आहे. ज्यामुळे उत्तर प्रदेशातील सपाने राज्याच्या राजकारणाला सर्वात खालच्या टप्प्यावर ढकलले आहे.”

काँग्रेस नेत्यानेही केली कडक कारवाईची मागणी

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्माच नव्हे तर ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री प्रताप सिंह खाचरिया (Pratap Singh Khacharia) यांनीही याप्रकरणी टीका केली. राज्यसभा खासदारावर त्वरित कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले. कठोर कारवाईची मागणी करत, काँग्रेस नेत्याने भारत सरकारला संसदेत असा प्रस्ताव आणण्याचे आवाहन केले. जेणेकरून इतिहासातील महापुरुषांवर अश्लील भाष्य करणाऱ्यांचे सदस्यत्व रद्द करता येईल.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.