काशी येथील ज्ञानवापी मशिदीत (Gyanvapi Case) न्यायालयाच्या आदेशाने पूजा चालू केल्यानंतर धर्मांधांकडून थयथयाट चालू आहे. गेल्याच आठवड्यात मौलाना तौकीर रझा (Maulana Taukir Raza) यांनी ‘ज्ञानवापीला शहिद होऊ देणार नाही’, असे प्रक्षोभक वक्तव्य केले होते. मौलाना तौकिर रजा यांनी ९ फेब्रुवारी रोजी शुक्रवारच्या नमाजानंतर ‘जेल भरो’ आंदोलन करण्याची धमकी दिला आहे.
(हेही वाचा – Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकसाठीच्या पदकांमध्ये असणार आयफेल टॉवरचा अंश)
आम्ही त्यांना ठार मारू
या परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. जुम्माच्या नमाजासाठी रवाना होण्यापूर्वी आय.एम.सी.चे प्रमुख मौलाना तौकीर रझा यांनी टिप्पणी केली आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांचे उल्लंघन केले जात आहे. जर कोणी गुन्हेगार असेल, तर त्याचे घर, मदरसा आणि मशीद बुलडोझर यांद्वारे कारवाई का केली जात आहे ? मी त्याला विरोध करेन. आम्हाला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे. कोणी आमच्यावर हल्ला केला, तर आम्ही त्यांना ठार मारू.
या धमकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामिया मैदानासह मौलानाच्या निवासस्थानासह प्रमुख रस्त्यांवर पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. तणावपूर्ण वातावरणामुळे शाळांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील बससेवा बंद करण्यात आल्या आहेत.
बरेली येथून करणार सुरुवात
मौलाना तौकीर रझा या वेळी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांचे उल्लंघन केले जात आहे. जर कोणी गुन्हेगार असेल, तर त्याचे घर, मदरसा आणि मशिदीचे बुलडोझर नष्ट का केले जात आहेत ? जर कोणी आमच्यावर हल्ला केला, तर आम्ही त्यांना ठार मारू. पोलीस आणि हिंदुत्वनिष्ठ पक्ष देश उद्ध्वस्त करत आहेत. याविरुद्ध आम्ही बरेली येथून मोहीम सुरू करत आहोत. ती देशभर चालू रहाणार आहे. (Maulana Taukir Raza)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community