माऊली सेवा मित्र मंडळाने नक्षली भागातील लोकांसह साजरी केली अविस्मरणीय दिवाळी!

...आणि अतिदूर्गम नक्षलप्रभावीत लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले

130

शहरापासून दूर असलेल्या अतिदूर्गम नक्षलप्रभावीत गोंदियातील मगरडोह चिचगड हद्दीत माऊली सेवा मित्र मंडळातर्फे दिपोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. विषेश म्हणजे पहिल्यांदाच या गावात अशी अविस्मरणीय दिवाळी साजरी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

अतिदूर्गम नक्षलप्रभावीत लोकांच्या चेहऱ्यावर हास्य

यावेळी स्थानिकांना फराळाचे साहीत्य, नवीन साड्या, नविनलुगडी, चाँकलेट, बिस्कीट व शालेय साहीत्य वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले, तसेच मुलांना विविध खेळणीही देण्यात आली. गोंदियातील चिचगड परिसरात १ नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात आलेल्या या दिवाळीत अतिदूर्गम नक्षलप्रभावीत स्थानिक लोकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.

(हेही वाचा -वंचित आदिवासी आणि बेघरांनी साजरी केली दिवाळी)

पोलिसांच्या मदतीने शक्य

गोंदियापासून दूर असलेल्या या दुर्गम भागापर्यंत पोहोचणे अत्यंत अवघड आहे, मात्र पोलीस प्रशासनाच्या सहकार्यामुळे हे अवघड काम सोपे झाले असून संपूर्ण सुरक्षेसह माऊली मित्र मंडळाने दिवाळी सण उत्साहात साजरा केला. यावेळी गोंदिया नक्षल सेलचे डीआयजी संदीप पाटील, अधीक्षक विश्व पानसरे, पोलीस उपअधीक्षक व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पुरेसा बंदोबस्त ठेवला होता. त्याबद्दल माऊली मित्र मंडळाने या सर्वांचे आभार मानले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.