PFI शी संबंधित मौलवीने हिंदु मुलीचे केले धर्मांतर; १० जणांच्या विरोधात गुन्हा नोंद

395
PFI शी संबंधित मौलवीने हिंदु मुलीचे केले धर्मांतर; १० जणांच्या विरोधात गुन्हा नोंद
PFI शी संबंधित मौलवीने हिंदु मुलीचे केले धर्मांतर; १० जणांच्या विरोधात गुन्हा नोंद

जिहादी आतंकवादाला प्रोत्साहन देणार्‍या झाकीर नाईक याचे व्हिडिओ पाहून उल्हासनगरमधील गणेशनगर येथील हिंदु महिला कल्पना चौधरी यांच्या दृष्टी नावाच्या मुलीने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. येथील मौलवीसह काही मुसलमानांनी दृष्टी हिचे नियोजनबद्ध धर्मांतर केल्याचे कल्पना चौधरी यांनी तक्रारीत म्हटले आहे. कल्पना चौधरी यांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दृष्टी हिच्यासह पोलिसांनी १० जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी आतापर्यंत २ जणांना पोलिसांनी अटक केली असून अन्य ८ आरोपींनी पलायन केले आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

(हेही वाचा – Mukhyamantri Ladki Bahin Yojana : अर्जांची छाननी करण्याचे आव्हान; प्रतितास ४० अर्जांची छाननी करण्याचे आदेश)

या धर्मांतराच्या षड्यंत्रामध्ये स्थानिक मदरशांतील मौलवीही सहभागी आहे. मौलवीसह काही स्थानिक मुसलमानांनी दृष्टीला फूस लावून तिला इस्लाम धर्म स्वीकारायला लावला. या प्रकरणातील मौलवी बंदी घातलेल्या पी.एफ्.आय. (PFI, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) या जिहादी आतंकवादी संघटनेशी संबंधित असल्याचे समजते.

हिंदु युवतीला इस्लामनुसार वागायला लावले

कल्पना चौधरी (Kalpana Chaudhary) यांच्या घराजवळच शबीना शेख आणि महेक शेख रहात होते. दृष्टी शबीना शेख यांच्या मुलींची शिकवणी घेण्यासाठी त्यांच्या घरी जात होती. या कालावधीत शेख कुटुंबियांनी दृष्टी हिला नमाजपठण करायला लावले, तसेच रोजा करण्यास सांगितला. तिला इस्लामनुसार वागायला लावले. शेख कुटुंबियांनी त्यांच्या मुलीसमवेत दृष्टी हिची बुरखा घातलेली छायाचित्रे संकेतस्थळावरूनही प्रसारित केली. एवढ्यावरच न थांबता दृष्टीच्या धर्मांतराची कागदपत्रेही सिद्ध केली. वडिलांच्या खात्यातील पैसेही काढले. उल्हासनगर येथील मदरशामध्ये दृष्टीचे धर्मांतर करण्यात आल्याची कागदपत्रे सिद्ध करण्यात आली. याविषयी कल्पना चौधरी यांनी वेळोवेळी मुलगी दृष्टी हिला समजवण्याचा प्रयत्न केला; मात्र ‘दृष्टीने न ऐकता मला मारहाण केली’, असे तिची आई कल्पना चौधरी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी कल्पना चौधरी यांनी पोलिसांत तक्रार केली असता दृष्टीने ‘आई वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडत असल्याचा, तसेच भाऊ आणि वडील बलात्कार करण्याचा प्रयत्न करत आहेत’, असे खोटे आरोप केले. या वेळी कल्पना चौधरी यांनी दृष्टीच्या धर्मांतराविषयीची कागदपत्रे पोलिसांना दाखवून झालेल्या प्रकार सांगितला. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील अन्वेषण चालू आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.