काळ्या जादूद्वारे समस्या सोडवण्याचा दावा करून Maulvi Naseem ने केला पीडितेवर अत्याचार

47
काळ्या जादूद्वारे समस्या सोडवण्याचा दावा करून Maulvi Naseem ने केला पीडितेवर अत्याचार
काळ्या जादूद्वारे समस्या सोडवण्याचा दावा करून Maulvi Naseem ने केला पीडितेवर अत्याचार

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बागपत जिल्ह्यात एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नसीम, ​​मेहताब आणि गफ्फार यांना सामूहिक बलात्काराप्रकरणी दि. ८ जानेवारी रोजी पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी नसीम (Maulvi Naseem) हा मौलवी आहे. नसीमने पीडितेला भूतबाधा करून तुरुंगात असलेल्या तिच्या पतीची सुटका करण्याची खोटी आशा दिली होती. बलात्कारादरम्यान पीडितेने विरोध केला तेव्हा तिला मारहाणही करण्यात आली. (Maulvi Naseem)

( हेही वाचा : Oswal Greentech Share Price : ओसवाल ग्रीनटेक कंपनीत महिनाभरात तब्बल १२ टक्क्यांची घसरण

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बागपतच्या (Baghpat) सिंघवली येथे घडली. येथील एका गावात राहणाऱ्या एका महिलेचा पती काही प्रकरणात दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. महिलेच्या पतीचा काका गफ्फार देखील त्याच तुरुंगात कैद होता. गफ्फार काही काळापूर्वी तुरुंगातून सुटला होता. गफ्फार हा मूळचा मुझफ्फरनगरचा रहिवासी होता. दरम्यान महिलेने पतीला तुरुंगातून सुटण्यासाठी काय करावे असे गफ्फारला विचारले. त्यावेळी गफ्फारने मौलवी नसीमने (Maulvi Naseem) केलेल्या काळ्या जादूमुळे तुरुंगातून सुटका झाल्याचे सांगितले.

त्यानंतर गफ्फारचे बोलण्याची पीडित महिलेला खात्री पटली. तिला मौलवी नसीमचा पत्ता मिळाला आणि तिने तिच्या पतीची सुटका करण्यासाठी काळी जादू करण्याची विनंती नसीमला केली. त्यानंतर नसीमने पीडितेला काळीजादू करण्याच्या बहाण्याने वासनेचे शिकार बनवले. पीडितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या बलात्कारात नसीमचा सहकारी मेहताब देखील सामील होता. पीडितेने विरोध केला तेव्हा मेहताब आणि नसीम यांनी मिळून तिला मारहाण केली. बलात्कारानंतर पीडितेने पतीचा काका गफ्फारला मौलवीच्या दुष्कृत्यांविषयी सांगितले. मात्र गफ्फारने पीडितीऐवजी मौलवीची (Maulvi Naseem) बाजू घेतली.

पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी नसीम, ​​मेहताब (Mehtab) आणि गफ्फार यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, ७० (१), ६१ (२) आणि ३५१ (२) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. दि. ८ जानेवारी रोजी पोलिसांनी नसीम, ​​मेहताब आणि गफ्फार यांना अटक केली. या प्रकरणात चौकशी आणि इतर आवश्यक कारवाई केली जात आहे.(Maulvi Naseem)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.