हाथरस येथे आग्रा-अलिगड राष्ट्रीय महामार्गावर मॅक्स वाहन आणि अलीगड डेपोच्या रोडवेज बसची धडक झाली. या अपघातात (Accident) एकाच कुटुंबातील 15 जणांचा मृत्यू झाला. तर 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 4 मुले, 4 महिला आणि 7 पुरुषांचा समावेश आहे. जे आग्रा येथील रहिवासी आहेत.
महामार्गावर मीटाई गावाजवळ शुक्रवारी सायंकाळी हा अपघात (Accident) झाला. माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्याचवेळी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. अपघातस्थळी पोलिस बंदोबस्त तैनात आहे. तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिस अपघाताचा तपास करण्यात व्यस्त आहेत. अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
(हेही वाचा Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवातील पावित्र्य आणि धर्मजागृतीसाठी शंभराहून अधिक गणेश मंडळ आली एकत्र)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मॅक्स लोडरमध्ये प्रवास करणारे लोक चालीसवेपासून परतत होते. त्यानंतर रोडवेजच्या बसला धडक दिली. अपघातातील (Accident) मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मॅक्सवर बसलेले लोक एकाच कुटुंबातील होते. जे सासणी येथील मुकुंद खेडा खंडौलीजवळील सेवला गावात परतत होते.
मॅक्समध्ये 30-35 लोक होते
प्रवासी प्रदीप गुप्ता यांनी सांगितले की, हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडले. ओव्हरटेक केल्याने हा अपघात झाला. रोडवेज बसने समोरून येणाऱ्या मॅक्सला धडक दिली. मॅक्समध्ये जवळपास 30-35 लोक होते. हा अपघात अतिशय भीषण आहे. मृतदेह विखुरलेले होते. लोक रक्ताने माखले होते. ओरडत होते. महिला आणि लहान मुलांचाही मृत्यू झाला आहे.
Join Our WhatsApp Community