Maya Tigress : ‘माया’ वाघिण बेपत्ता, ताडोबा प्रशासनाकडून शोधाशोध सुरू

माया वाघिणीची टी-१२ नावाने वन विभागाच्या दफ्तरी नोंद आहे

172
Maya Tigress : 'माया' वाघिण बेपत्ता, ताडोबा प्रशासनाकडून शोधाशोध सुरू
Maya Tigress : 'माया' वाघिण बेपत्ता, ताडोबा प्रशासनाकडून शोधाशोध सुरू

जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनाला (World Famous Tadoba Tiger Reserve Tourism) रविवार, १ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली, मात्र सेलिब्रिटी वाघीण अशी ओळख असलेली ‘माया’ वाघीण (Maya Tigress) बेपत्ता झाल्यामुळे तिला शोधण्यासाठी ताडोबा प्रशासनाचे सध्या प्रयत्न सुरू आहेत.

ही वाघीण २५ ऑगस्टला शेवटी पंचधारा या लोकेशनवर मंजुरांना दिसली होती. ती १३ वर्षांची आहे. ती मजूरांना दिसली तेव्हा ती गरोदर असल्यासारखे वाटत होते. त्यामुळे आता तिच्या जवळ तिचे बछडे असल्याने ती बाहेर येत नसण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने उचलले हे पाऊल; वाढवली सुरक्षा )

माया वाघिणीचा माग काढण्यासाठी सध्या १२५ कॅमेरा ट्रॅप (125 camera trap) लावण्यात आले आहेत. माया वाघिणीचा अधिवास असलेल्या पांढरपौनी भागात आहे.  सध्या या भागात पाणी खूप असल्याने वाहनांच्या मदतीने तिचा माग काढला जात आहे.

माया वाघिणीची टी-१२ नावाने वन विभागाच्या दफ्तरी नोंद आहे. अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सेलिब्रिटी वाघीण अशी तिची ओळख आहे. पर्यटकांना ती कधी एकटी, तर कधी इतर वाघांबरोबर, तर कधी तिच्या बछड्यांसोबत दिसते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांना बघण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येत असतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.