शिवडीकरांचा पाणीपुरवठा पूर्ववत करणाऱ्या जल अभियंत्यांचा महापौरांकडून सत्कार

जलवाहिनीवरील व्हॉल्वचे काम युध्दपातळीवर करण्यात आल्यानंतर या परिसरातील पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आणि पाणीपुरवठाही सुरळीत झाला.

83

शिवडी परिसरातील काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांची प्रचंड गैरसोय होत होती. त्यामुळे याबाबतच्या तक्रारीची दखल घेत जल अभियंता विभागाने या अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा शोध घेतला. त्यामध्ये ही समस्या गोलंदाजी हिल जलाशयामधून होणारा पाणी पुरवठा कमी असल्याचे जलअभियंता विभागाने शोधून काढले. आणि त्यानंतर येथील पाणी पुरवठा पूर्ववत केल्यानंतर या भागातील कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्याची समस्याच मिटली. त्यामुळे यासाठी विशेष मेहनत घेतलेल्या जलअभियंता विभागातील सहायक अभियंता शैलेंद्र सोनटक्के यांच्यासह त्यांच्या टिममधील सहकाऱ्यांना महापौर किशोरी पेडणेकर यांच्याहस्ते प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले.

संपूर्ण जलवाहिनीचे काम दिवस-रात्र करण्यात आले!

शिवडीतील शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांच्या प्रभाग क्रमांक २०६मध्ये मागील काही महिन्यांपासून पाण्याचा पुरवठा हा कमी प्रमाणात होत होता. त्यानंतर महापालिका एफ-दक्षिण विभागातील जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी पाहणी केली. या पाहणीत ‘गोलंदजी हिल’ या जलाशयामध्ये असणारा पाणीपुरवठाच कमी प्रमाणात असल्याचे पाहणीत दिसून आले. त्यामुळे जलाशयाला जोडणाऱ्या आणि शिवडीला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील मुख्य व्हॉल्वचे काम शिवडी बस आगाराच्या ठिकाणी असल्यामुळे या संपूर्ण जलवाहिनीचे काम शिवडी बस डेपो येथे दिवस-रात्र करण्यात आले. जलवाहिनीवरील व्हॉल्वचे काम युध्दपातळीवर करण्यात आल्यानंतर या परिसरातील पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आणि पाणी पुरवठाही सुरळीत झाला होता.

IMG 20210713 WA0092

(हेही वाचा : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ७ मोठे प्रकल्प १५ वर्षांपासून अपूर्ण!)

जलाभियंत्यांचे कौतुक!

जलअभियंता विभागाच्या या अभियंत्यांनी कमी प्रमाणात येणाऱ्या पाण्याचा शोध लावतानाच या भागाचा पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी घेतलेली मेहनत हे वाखाण्याजोगी आहे. त्यांचे कार्य कौतुकास पात्र आहे. त्यामुळे या सर्व चमुच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून त्यांचा गौरव करण्याची मागणी स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ यांनी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार त्यांनी या सर्व चमुंचा सन्मान करण्याचे मान्य केले आहे. पण तत्पूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याहस्ते सहाय्यक अभियंता शैलेंद्र सोनटक्के, दुय्यम अभियंता अभिजीत देसाई, कनिष्ठ अभियंता योगेश कोंडगेकर आदींसह इतरांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जलअभियंता तथा उपायुक्त अजय राठोड, नगरसेवक सचिन पडवळ व एफ दक्षिण विभागातील जलअभियंता खात्याचे कर्मचारी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.