मुलीच्या नावे जमा होणार ५० हजार रुपये! जाणून घेऊया ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेविषयी…

136

पालकांना आपल्या मुलीच्या चांगल्या शिक्षणासह त्यांच्या लग्नाचीही चिंता असते. यासाठी पालक अनेक नव्या नव्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. सरकारमार्फत सुद्धा मुलींच्या उज्जवल भविष्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. यातील माझी कन्या भाग्यश्री या योजनेची माहिती पुढीप्रमाणे आहे.

( हेही वाचा : कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश! १०० टक्के रिक्त पदे भरण्यास मान्यता)

माझी कन्या भाग्यश्री योजना

  • राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांच्या आरोग्याचा दर्जा वाढवणे, त्यांना शिक्षण देणे, स्त्रीभ्रूणहत्या रोखणे, बालविवाहास प्रतिबंध करणे या उद्दिष्टांसाठी माझी कन्या भाग्यश्री ही योजना महाराष्ट्र सरकारने १ एप्रिल २०१६ रोजी लागू केला होती.आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय १८ वर्ष, दहावी उत्तीर्ण आणि अविवाहित असणे बंधनकारक आहे.
  • कुटुंब नियोजनाच्या नियमांचे पालन केल्यावर सरकारकडून एका मुलीच्या नावे ५० हजार रुपये किंवा दोन मुली असल्यास २५ हजार प्रत्येकी असे पैसे बॅंकेत जमा होणार आहेत.

योजनेचा उद्देश

सुकन्या योजनेच्या सर्व अटी व शर्ती माझी कन्या भाग्यश्री या योजनेमध्ये लागू करण्यात आले आहेत.

  1. लिंग निवडीस प्रतिबंध करणे
  2. बालिकेचा जन्मदर वाढविणे
  3. मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे
  4. बालिकेचा समान दर्जा व शैक्षणित प्रोत्साहनाकरता समाजात कायमस्वरुपी सामुहिक चळवळ निर्माण करणे
  5. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे

माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे दोन प्रकार

  • एकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंबनियोजन केले आहे.
  • दोन्ही मुली आहेत आणि मातेने दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे.
  • सदर योजनेचा लाभ ऑगस्ट २०१७ व त्यानंतर जन्मलेल्या मुलींना घेता येईल.
  • ही योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या तसेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न ७.५ लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुबांना याचा लाभ मिळेल.

( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या ताफ्यात येणार Digital बसेस; प्रवाशांचीही पसंती!)

लाभाचे स्वरूप

  • आई व मुलीच्या नावे जॉईन अकाउंट यामध्ये ५ हजारांपर्यंत ओव्हरड्राफ्ट आणि १ लाख रुपये अपघात विमा या सुविधा मिळतील.
  • शासनामार्फत मुलीच्या नावे बॅंकेत ५० हजार रुपये मुदत ठेव स्वरूपात ठेवण्यात येतील ( दोन मुली असतील तर प्रत्येकी २५ हजार रुपये)
  • जमा झालेली व्याजाची रक्कम मुलगी ६ वर्षांची झाल्यावर काढता येईल त्यानंतर पुन्हा मुलगी १२ वर्षांची झाल्यानंतर काढता येईल.
  • मुलगी १८ वर्षांची झाल्यावर पूर्ण रक्कम काढण्यात येईल.
  • या योजनेचा लाभ बालगृहातील अनाथ मुलींना तसेच दत्तक मुलींनाही घेता येईल.
  • दुर्दैवाने मुदतीपूर्वी मुलीचा मृत्यू झाल्यास योजनेची रक्कम पालकांना देण्यात येईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.