जून महिन्यात MBBS च्या परीक्षा होणार!

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या एमबीबीएस, बीडीएस आदी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली होती.

जून महिन्यात MBBS च्या परीक्षा होणार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी तशी माहिती जाहीर केली. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून या परीक्षा सुरु होणार आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. वाढती रुग्णसंख्या आणि राज्यातील गंभीर परिस्थिती पाहता अनेक परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता जूनच्या पहिल्या आठवड्यापासून एमबीबीएस आणि एमडीच्या इतर वर्षाच्या परीक्षा घेण्यात येतील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

(हेही वाचा : निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवरच गुन्हा दाखल व्हावा! उच्च न्यायालयाचा संताप )

विद्यार्थ्यांचीच होती मागणी!

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या एमबीबीएस, बीडीएस आदी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली होती. सुरुवातीला या परीक्षा १९ एप्रिल ते ३० जून या दरम्यान घेतल्या जाणार होत्या. मात्र, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विद्यार्थी, लोकप्रतिनिधी आणि संघटनांकडून मागणी होत होती. दरम्यान, या मागणीनुसार आता या परीक्षा जूनमध्ये घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here