मॅकडॉनल्डने (McDonalds) श्रावण स्पेशल मेन्यू सादर केला आहे. हा मेन्यू पाहून अनेक ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. मॅकडॉनल्डने श्रावण महिन्यात कांदा व लसूण नसलेला बर्गर सादर केला आहे. काही फूड ब्लॉगर्सनी हा मेन्यू व कांदा-लसणाचा समावेश न केलेल्या बर्गरचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कमेंट्सद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.
(हेही वाचा –Thane Drug : एनसीबी कडून ठाणे जिल्ह्यातील ड्रग्सचे सिंडिकेट उध्वस्त)
अनेकजण श्रावणात मांसाहारासह कांदा व लसूण खाणं टाळतात. या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मॅकडॉनल्ड (McDonalds) इंडियाने कांदा व लसूण न घातलेला बर्गर सादर केला आहे. या बर्गरचा एक व्हिडीओ Eat.Around.The.City नवाच्या एका फूड ब्लॉगरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या ब्लॉगरने व्हिडीओत म्हटलं आहे की “श्रावण महिन्यात तामसिक अन्नापासून दूर राहणाऱ्या लोकांसाठी मॅकडॉनल्डचा नवा बर्गर, लोक हा बर्गर निसंकोचपणे खाऊ शकतात, कारण मॅकडॉनल्डचं शाकाहारी व मांसाहारी पदार्थांसाठीचं किचन वेगवेगळं असतं.”
View this post on Instagram
(हेही वाचा –Bangladesh Violence : बांगलादेशातील हिंसाचाराचा भारतीय शेतकऱ्यांवर असा होतोय परिणाम?)
एका युजरने या व्हिडीओवर कमेंट केली आहे की “जिथे मांसाहारी व शाकाहारी अशा दोन्ही प्रकारचं जेवण बनवलं जातं तिथं कसला श्रावण स्पेशल मेन्यू?” दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे की “उगाच मॅकडॉनल्डचा प्रचार करू नका. ती वाईट कंपनी आहे, त्यांच्या पदार्थांमुळे लोक आजारी पडतात”. आणखी एका युजरने म्हटलंय, “मॅकडॉनल्ड लवकरच उपवास करणाऱ्या लोकांसाठी साबूदाना बर्गर विकण्यास सुरुवात करेल.” काही युजर्सने म्हटलंय, “मुळात श्रावण महिन्यात हे सगळं खायची काय गरज? त्याऐवजी घरी शिजवलेलं शुद्ध आणि साधं भोजन करावं.” अशा संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. (McDonalds)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community