महालक्ष्मी जवळील रेल्वे उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा, महापालिकेने केली अशी कारवाई

तोडण्यात आलेल्या पात्र झोपडीधारकांचे 'ई' विभाग कार्यालयामार्फत कायदेशीररित्या पुनर्वसन करण्यात आले आहे. ही १६ अतिक्रमणे काढल्यामुळे उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाचा मार्ग मोकळा झालेला आहे.

133

केशवराव खाड्ये मार्गावर महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ, रेल्वेमार्गावर मुंबई महापलिकेच्या वतीने उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामामध्ये बाधित होत असलेल्या ४८ पैकी १६ बांधकामे पहिल्या टप्प्यात सोमवारी ‘इ’ विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाचा मार्ग मोकळा झालेला आहे. पुढील अतिक्रमणे काढण्यासाठी, बाधितांचे पुनर्वसन करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

वाहतूक होणार सुरळीत
संत गाडगे महाराज चौक (सातरस्‍ता) येथून केशवराव खाड्ये मार्गावर हाजी अलीच्‍या दिशेने केबल स्‍टेअड पद्धतीने मुंबई महानगरपालिकेमार्फत पूल बांधण्‍यात येत आहे. हा पूल सध्‍याच्‍या महालक्ष्‍मी पुलावरील वाहतूक कमी करण्‍यासाठी महत्वाचे ठरणार आहे. तसेच सध्‍या काम सुरु असलेल्‍या सागरी किनारा रस्त्यावरुन येणारी आण‍ि दक्षिण मध्‍य मुंबईकडे जाणारी वाहतुकही सुरळीत होण्यास मदत होईल.

हा उड्डाणपूल महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेमार्गावर बांधण्यात येत आहे. या उड्डाण पुलाच्या बांधकामामध्ये ‘ई’ विभागातील एकूण ४८ बांधकामे बाधित होत आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील १६ बांधकामे सोमवारी ‘ई’ विभाग कार्यालयामार्फत तोडण्यात आली.

पहिल्या टप्प्यातील १६ बांधकामे हटवली
तोडण्यात आलेल्या पात्र झोपडीधारकांचे ‘ई’ विभाग कार्यालयामार्फत कायदेशीररित्या पुनर्वसन करण्यात आले आहे. ही १६ अतिक्रमणे काढल्यामुळे उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाचा मार्ग मोकळा झालेला आहे. पुढील अतिक्रमणे काढण्यासाठी, बाधितांचे पुनर्वसन करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसांत ती पूर्ण करुन उर्वरित अतिक्रमणे देखील हटविण्यात येणार आहे.

कारवाईत यांनी घेतला भाग
उपायुक्त (परिमंडळ १) विजय बालमवार, ‘ई ‘ विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता शफी मोमीन, सहाय्यक अभियंता दीपक झुंजारे, दुय्यम अभियंता प्रवीण मुळूक, कनिष्ठ अभियंता दीनानाथ पालवी यांनी ही अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही पार पाडली. आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कोरगांवकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त पुरवला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.