मुंबईत पदवीधरांना नोकरीची संधी; परीक्षेविना केली जाणार निवड, ५० हजारापर्यंत मिळेल पगार

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मुंबई डिस्ट्रिक्ट्रस एड्स कंट्रोल सोसायटी येथे क्लस्टर प्रोग्राम मॅनेजर, क्लिनिकल सर्व्हिसेस ऑफिसर, डेटा मॉनिटरिंग आणि डॉक्युमेंटेशन ऑफिसर विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०२२ आहे.

( हेही वाचा : बेस्ट- एसटीच्या विशेष बसेस मुंबईकरांच्या सेवेत; मेगाब्लॉकमुळे १०९६ लोकल फेऱ्या रद्द! )

अटी व नियम जाणून घ्या…

 • पदाचे नाव – क्लस्टर प्रोग्राम मॅनेजर, क्लिनिकल सर्व्हिसेस ऑफिसर, डेटा मॉनिटरिंग आणि डॉक्युमेंटेशन ऑफिसर
 • नोकरी ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा –

क्लस्टर प्रोग्राम मॅनेजर – ५० वर्ष
क्लिनिकल सर्व्हिसेस ऑफिसर – ४५ वर्ष
डेटा मॉनिटरिंग आणि डॉक्युमेंटेशन ऑफिसर – ४५ वर्षे

 • अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

प्रोजेक्ट डायरेक्टर, मुंबई डिस्ट्रिक्ट्स एड्स कंट्रोल सोसायटी, एकवर्थ कॉम्प्लेक्स, आर.आर. किडवई मार्ग, SIWS कॉलेजजवळ, वडाळा ( पश्चिम) मुंबई – ४०००३१

 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ नोव्हेंबर २०२२
  अधिकृत वेबसाईट – mdacs.org.in
 • शैक्षणिक पात्रता
 • क्लस्टर प्रोग्राम मॅनेजर – पदवी
 • क्लिनिकल सर्व्हिसेस ऑफिसर – पदव्युत्तर पदवी
 • डेटा मॉनिटरिंग आणि डॉक्युमेंटेशन ऑफिसर – पदव्युत्तर पदवी

वेतनश्रेणी

 • क्लस्टर प्रोग्राम मॅनेजर – ५४ हजार ३०० रुपये
 • क्लिनिकल सर्व्हिसेस ऑफिसर – ४६ हजार ८०० रुपये
 • डेटा मॉनिटरिंग आणि डॉक्युमेंटेशन ऑफिसर – ३७ हजार ५०० रुपये

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here