पुण्यातील स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ‘मी सावरकर’ या अभिनव वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला होण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येते. डेक्कन एज्युकेशन सोसायटी या स्पर्धेची सहसंयोजक आहे, तर दादर (मुंबई) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे स्पर्धेला विशेष सहकार्य लाभले आहे. ही व्हॉट्सअॅपद्वारे घेण्यात येणारी निःशुल्क दृक्श्राव्य वक्तृत्व स्पर्धा आहे. या स्पर्धेत मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भारतीय प्रादेशिक भाषांतून सहभाग घेता येणार आहे. (Me Savarkar) या स्पर्धेचे हे आठवे वर्ष आहे.
कोणकोणत्या माध्यमातून घेता येणार सहभाग ?
व्याख्यान
विविध गट (वेळ मर्यादा ७ मिनिटे)
१. अखंड भारत
२. हिंदू समाज फोडण्याची आजची षडयंत्रे
३. हलाल प्रमाणपत्र: हिंदूंचा काय संबंध?
४. सावरकरांच्या विचारांमधला हिंदू
५. सावरकरांचे ‘इंडिया हाऊस’ पर्व
६. सावरकर सिनेमामधील मला आवडलेला प्रसंग
(वक्तृत्व स्पर्धेकरिता वरील सहा विषयांपैकी कुठल्याही एका विषयावर सादरीकरण करायचे आहे.)
संगीतमय सावरकर
खुला गट (वेळ मर्यादा १० मिनिटे)
सावरकरांनी रचलेल्या कोणत्याही एका कवितेचे नव्या चालीत / ढंगात सादरीकरण व्हिडिओ स्वरूपात पाठवावे. वाद्यांची साथ-संगत असल्यास उत्तम, पण अत्यावश्यक नाही.
काव्य निरूपण
खुला गट (वेळ मर्यादा ७ मिनिटे)
स्वातंत्र्यवीर सावरकर रचित ‘गणेश प्रार्थना’ याचे निरूपण सादर करावे.
नाट्यवाचन
खुला गट (वेळ मर्यादा १० मिनिटे)
सावरकरांनी लिहिलेल्या कोणत्याही नाटकातील प्रवेशाचे वाचन (फक्त ऑडिओ स्वरूपात).
वाद-विवाद कौशल्य
खुला गट (वेळ मर्यादा १५ मिनिटे)
समान नागरी कायदा हवा की नको?
दोन स्पर्धकांच्या संघाने सहभाग. एक स्पर्धक विषयाच्या बाजूने (अनुकूल), दुसरा स्पर्धक विषयाच्या विरुद्ध (प्रतिकूल) भाषण करेल. दोन्ही स्पर्धकांना प्रत्येकी ५ मिनिटे वेळ आहे. दोन्ही स्पर्धकांना २ मिनिटे वेळ प्रत्युत्तर द्यायला असेल.
स्पर्धेचे गट आणि वयोमर्यादा
• गट क्र. १ (विद्यार्थी इयत्ता ५-८)
• गट क्र. २ (विद्यार्थी इयत्ता ९-१२)
• गट क्र. ३ (महाविद्यालयीन विद्यार्थी पदवीपर्यंत)
• युवा गट (वय वर्षे २२ ते ४५ पर्यंत) • वरिष्ठ गट (वय वर्षे ४५ ते ६० पर्यंत)
• ज्येष्ठ गट (वय वर्षे ६० आणि पुढे)
व्यावसायिक गट (डॉक्टर, वकील, सीए, सीएस, सीएमए, चार्टर्ड इंजिनिअर, आर्किटेक्ट इत्यादी)
रेकॉर्डिंग पाठविण्याची अंतिम कालमर्यादा : ३१ डिसेंबर २०२४
- स्वपरिचयासाठी ३० सेकंदांची अतिरिक्त काल मर्यादा आहे. गटनिहाय WhatsApp क्रमांक नोव्हेंबर महिन्यात कळविण्यात येतील.
- प्रत्येक गटात प्रथम पारितोषिक ₹१०,००० असणार आहे.
- महाविजेत्यास कॅप्टन नीलेश गायकवाड यांच्या सौजन्याने अंदमान यात्रा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पणदिनानिमित्त अंदमान येथे बोलण्याची संधी मिळणार आहे.अधिक माहितीसाठी +91 89566 42736 किंवा [email protected] तसेच www.mesavarkar.com येथे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Me Savarkar)
- हेही पहा –