मुंबईत गोवरची साथ! ‘या’ वयोगटातील बालकांना सर्वात जास्त धोका

मुंबईत यंदाच्या वर्षांत तब्बल 109 गोवरचे रुग्ण सापडले आहेत. या वाढत्या संख्येत आतापर्यंत दोन ते पाच वयोगटातील मुलांना सर्वात जास्त गोवरचा संसर्ग झाला आहे. या वयोगटातील 33 रुग्ण सापडल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

( हेही वाचा : ‘बेस्ट’चे ५ रुपये तिकीट, तरीही फुकट्यांची घुसखोरी! १.१३ लाख प्रवाशांवर कारवाई)

रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या बालकांना गोवर या संसर्गजन्य आजारांची बाधा होते, ही बालके फारच कमी वजनाची किंवा कित्येकदा कुपोषित असतात, अशी माहिती बालरोगतज्ञ डॉ. अमोल अन्नदाते यांनी दिली. या मुलांच्या शरीरात अ जीवनसत्वाची कमतरता आढळून येते. त्यामुळे गोवर प्रतिबंधात्मक लस देणे हा उपाय डॉक्टरांकडून तातडीने राबवला जातो. सध्या पालिकेने अतिरिक्त लसीकरण मोहिमेवर भर दिला आहे.

109 गोवरबाधित रुग्णांपैकी वयोगटानुसार रुग्णांची संख्या

वयोगट – रुग्णांची संख्या

  • 0 ते 1 -27
  • 1 ते 2 Years -22
  • 2 ते 5 years -33
  • पाच वर्षापुढील -27

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here