राज्यात वेगाने पसरतोय गोवरचा संसर्ग; रुग्णसंख्या अकरा हजारांच्याही पुढे

मुंबईत गोवरमुळे १४ मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच राज्यात आता औरंगाबाद आणि पिंपरी-चिंचवडमध्येही गोवरचे रुग्ण आढळून आले आहे. आता राज्यात ७१७ गोवरबाधित रुग्ण असून, संशयित रुग्णांची संख्या ११ हजार ३९०वर पोहोचली आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांत ७४ ठिकाणी गोवरचा उद्रेक झाल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली. उद्रेक झालेल्या ठिकाण युनानी तसेच खासगी डॉक्टरांच्या संघटनेचीही मदत घेतली जाणार आहे.

( हेही वाचा : अत्युत्कृष्ट कामासाठी पात्र कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढीचा लाभ मिळणार )

औरंगाबादमध्ये ९६ तर पिंपरी चिंचवडमध्ये २५६ गोवरचे संशयित रुग्ण

मंगळवारी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादमध्ये नेहरुनगर आरोग्य केंद्रातील भागांत ७ रुग्णांना तर पिंपरी चिचवडमधील कुडळवाडी येथील आरोग्य केंद्रात ८ रुग्णांना गोवरची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. औरंगाबादमध्ये गोवरचे ९६ तर पिंपरी-चिंचवडमध्ये गोवरचे २५६ संशयित रुग्ण असल्याचेही आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

राज्यात गोवरचा उद्रेक झालेल्या भागांत आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षण पथकांची संख्या – ८२५

मंगळवारपर्यंत सर्व्हेक्षण केलेल्या घरांची संख्या – ९ लाख ८० हजार ८८३

अ जीवनसत्त्वाची मात्रा देण्यात आलेल्या बालकांची संख्या – २४ हजार १५

गोवर-रुबेला आजारावर प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस दिलेल्या बालकांची संख्या – ८ हजार ६५४

गोवर-रुबेला दुसरा डोस देण्यात आलेल्या बालकांची संख्या – ६ हजार ६२०

७४ उद्रेक झालेल्या जिल्ह्यांचा तपशील

जिल्हा – एकूण उद्रेक – संशयित रुग्णांची संख्या — बाधित रुग्णांची संख्या — मृत्यू

  • मुंबई — ३४ — ४ हजार ६२ — ३०३ — १०
  • मालेगाव मनपा — १२ — ७८१ — ७० — ०
  • भिवंडी मनपा — १० — ७९३ — ४८ — ३
  • ठाणे मनपा — ६ — ४८९ — ४४ — ०
  • ठाणे जिल्हा — २ — १३० — १५ — ०
  • वसई-विरार मनपा — ३ — १७६ — ११ — १
  • पनवेल मनपा — १ — १४६ — ५ — ०
  • नवी मुंबई मनपा — ४ — २३० — १२ — ०
  • औरंगाबाद — १ — ९६ — ७ — ०
  • पिंपरी-चिंचवड — १ — २५६ — ८ — ०

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here