मुंबईत आठ विभागांत गोवरची पसरली साथ; रुग्णसंख्या १४२च्या घरात

81

मुंबईत सप्टेंबर महिन्यापासून गोवर या आजाराचा उद्रेक होत असून, यंदाच्या आठवड्यात आता तीन नव्या विभागांत गोवरचे रुग्ण आढळले आहेत. एम-पूर्व म्हणजेच गोवंडीसह, ई, एफ-उत्तर, जी-दक्षिण, एम,एम-पश्चिम, पी-उत्तर आणि एच पूर्व या विभागांत मिळून आता गोवरच्या रुग्णांची संख्या १४२ पर्यंत पोहोचली आहे.याआधी जी-उत्तरमध्येही गोवरचे रुग्ण सापडल्याची पालिका विभागाने माहिती दिली होती परंतु नंतर जीउत्तर ऐवजी जी-दक्षिण येथे रुग्ण सापडल्याचे सांगत पालिका अधिका-यांनी सारवासारवची भूमिका घेतली. पालिका आरोग्य विभागाने लसीकरण वाढवण्यासाठी तसेच संशयित रुग्ण शोधण्यासाठी आता चांगलीच कंबर कसली आहे.

या विभागांत ताप आणि पूरळचे तब्बल १ हजार ७९ रुग्ण सापडल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली. मुंबईत वाढत्या गोवरची साथ नियंत्रणात आणण्यासाठी आता पालिका मुख्यालयात साथरोग नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये पालिका आरोग्य विभागाने ९ महिने ते ५ वर्षांच्या बालकांचा हेड काऊंट सर्व्हेक्षण केले होते. या सर्व्हेक्षणाच्या आधारावर तब्बल १९ हजार ८९४ बालकांना गोवर रुबेला पहिली मात्रा तसेच गोवर मम्स रुबेरा या लसीकरण येत्या दहा दिवसांत देण्याची तयारी पालिका आरोग्य विभागाने केली आहे. १० दिवसांत जोखीमग्रस्त विभागांत ४०० अतिरिक्त लसीकरणाचे सत्र राबवले जाईल.

या रुग्णालयांत मिळणार उपचार

गोवर रुग्णांचा सर्वात जास्त भार पेलणा-या कस्तुरबा रुग्णालयात आता ८३ गोवरबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यात तीन अंतरुग्ण विभाग तसेच ५ व्हेटिंटेरच्या सुविधाही पालिकेने दिल्या आहेत.

गोवंडीतील शिवाजी नगर येथील नागरी आरोग्य केंद्र येथे सौम्य लक्षण असलेल्या रुग्णाकरिता राखीव करण्यात आले आहे.

गोवरमुळे गंभीर अवस्थेत पोहोचलेल्या रुग्णांना गोवंडीतील शताब्दी रुग्णालय तसेच घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार दिले जातील

अतिगंभीर अवस्थेतील रुग्णांना चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार दिले जातील. या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याकरिता रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे.

शिक्षण विभागाशीही समन्वय

ताप आणि पूरळचे अतिरिक्त रुग्ण शोढण्यासाठी पालिका आरोग्य विभागाने शिक्षण विभागाशी समन्वय साधला आहे. शाळेत ताप व पुरळ आलेल्या मुलांबाबत तातडीने मााहिती द्या, अशी सूचना आरोग्य विभागाने शिक्षण विभागाला केली आहे.

मनुष्यबळाची जुळवाजुळव

४७० आशा वर्कर्स, २०० स्वयंसेवक मिळून मुंबईभरात आता नियमित लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जाईल, असे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले. यात गोवर प्रतिबंधक लसीसह नवजात बालकांना पालिकेच्यावतीने मोफत मिळणा-या सर्व लसींचा समावेश असेल का, याबाबतची माहिती मिळू शकली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.